कायदा हे प्रभावी शस्त्र असून स्रियांनी कायद्याचा वापर ढालीप्रमाणे करावा’- अँड.डॉ. विजेता सिंग
चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समितीतर्फे ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ (संरक्षण प्रतिबंध मनाई निवारण अधिनियम २०१३) या कायद्याबाबत जाणीव जागृती कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या संस्थापिका व माजी शिक्षणमंत्री कै.ना.अक्कासो सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील तसेच संस्थेच्या सचिव डॉ.सौ.स्मिताताई संदीप पाटील यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ.शुभांगी पाटील यांनी सुरेल स्वागतगीत सादर केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी हे उपस्थित होते तसेच याप्रसंगी मार्गदर्शक व प्रमुख वक्त्या ऍड.प्रा.डॉ.विजेता सिंग, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम. बागुल, उपप्राचार्य डॉ.ए.बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, महिला तक्रार निवारण समिती प्रमुख सौ.माया शिंदे, युवती सभा प्रमुख डॉ.सौ.पी.एम.रावतोळे व सौ.विशाखा देसले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी वक्त्यांचा परिचय सौ. आरती पाटील यांनी करून दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना महिला तक्रार निवारण समिती प्रमुख सौ. माया शिंदे यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका व महत्व स्पष्ट केले.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्त्या व मार्गदर्शक ऍड.प्रा.डॉ.विजेता सिंग हे ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ संरक्षण (प्रतिबंध मनाई निवारण अधिनियम २०१३)’ या विषयावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘कायदा हा स्रियांना स्वसंरक्षणासाठीचे एक प्रभावी शस्त्र आहे.म्हणून आजच्या स्रियांनी तसेच सुशिक्षित विद्यार्थिनींनी या कायद्याची माहिती करून घ्यावी.समाजात इतर स्रियांना सक्षम करण्यासाठी कायदेविषयक जागरूकता निर्माण करणे काळाची गरज आहे. कायद्याचा गैरवापर कोणीही करू नये तर कायद्याचा वापर हा ढालीप्रमाणे करावा.म्हणून स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी कायदेविषयक ज्ञान असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी अधिनियम २०१३ संदर्भात विस्तृत माहिती दिली. या कायद्याची पार्श्वभूमी, त्याचा उगम कसा झाला, या कायद्यातील १७ तरतुदी तसेच कायद्याची सामाजिक वास्तविकता यांचे उदाहरणांसहित स्पष्टीकरण केले. अंतर्गत तक्रार समितीचे गठन कसे करायचे असते व समितीची कार्य प्रणाली, तिचे अधिकार यांची सखोल माहिती दिली.
यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थिनी हर्षदिव्या ह्या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले व ह्या कार्यक्रमातून कायद्यांविषयी अतिशय उपयुक्त माहिती मिळाल्याचे नमूद केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘स्रियांना दुय्यय वागणूक देणे ही खेदाची बाब आहे. स्रियांना विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध करून दिल्यास त्यांचा अधिक व्यक्तिमत्त्व विकास होण्यास मदत होईल. आजच्या विद्यार्थिनींनी तसेच महिलांनी कायद्याचा अभ्यास करावा, कायद्याचे ज्ञान प्राप्त करावे तसेच स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सौ. प्रीती रावतोळे यांनी केले तर आभार सौ. विशाखा देसले यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. व्ही आर कांबळे, डॉ. एम. एल.भुसारे, डॉ. एल. बी. पटले, डॉ. आर आर पाटील, डॉ. एम. बी. पाटील, एम. ए. पाटील, डॉ. सौ. संगीता पाटील, नितेश सोनवणे, अनिल पाटील, उज्वल मराठे तसेच सर्व समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. पी. एन सौदागार, सौ राजश्री निकम, सौ. अनीता लांडगे, सौ. शिरीन सय्यद, सौ. पी. आर. दाभाडे, सौ. कांचन पाटील, सौ. धनश्री पाटील, सौ. सुवर्णा पवार, सौ. कीर्ती मोरे , सौ. एस. एन नन्नवरे, कु, सेजल देवरे, श्रीमती अश्वीनी जाधव बहुसंख्य विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.