पंडितराव शिंदे विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात
पाचोरा.
येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित तात्यासाहेब पंडितराव परशराम शिंदे माध्यमिक विद्यालयात आज दिनांक 18 जानेवारी, शनिवार रोजी “बाल आनंद मेळावा” उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, सचिव ॲड. जे. डी. काटकर, सहसचिव प्रा. डॉ. शिवाजी शिंदे, संचालक सौ. सिंधुताई शिंदे, मा. नगरसेविका सौ. विजयाताई शिंदे , कै. पी. के. शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. व्ही. गीते, मुख्याध्यापिका सौ. पूजाताई शिंदे, महेश देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. सोहळ्याचे अध्यक्ष ॲड. जे.डी. काटकर, प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. शिवाजी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीमती अल्फा सहानी या गुणवंत शिक्षिका, तसेच गुणवंत विद्यार्थी प्रज्वल मालपुरे याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महेश देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेतील विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली. श्रीमती अल्फा सहानी यांनी सूत्रसंचालन तर श्री. एस. पी. पाटील सर यांनी आभार मानले.
या बाल मेळाव्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कलाकृतींच्या कलादालनाचे उद्घाटन सौ. सिंधुताई शिंदे यांच्या हस्ते, तर खानाखजाना स्टॉल्स चे उद्घाटन सौ. विजयाताई शिंदे यांच्या हस्ते झाले. विद्यालयातील विद्यार्थी कस्तुरी चित्ते, तेजस परदेशी, हर्षदा राठोड, उर्वशी जाधव यांनी साकारलेल्या रांगोळी, हस्तकला, चित्रकला विविध कलाकृती प्रदर्शनासाठी मांडण्यात आल्या होत्या. बाल आनंद मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी श्रीमती. के. डी.पाटील. मॅडम रीना महाजन मॅडम, नंदू सोनजे व गव्हाणे सर सहकार्य लाभले. बहुसंख्य पालकांनी उपस्थिती देऊन बाल आनंद मेळाव्याचा आनंद घेतला. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.