बिल्दी फाट्यावर अवैध पणे दारू विकणाऱ्यावर पाचोरा पोलिसांची धाड

बिल्दी फाट्यावर अवैध पणे दारू विकणाऱ्यावर पाचोरा पोलिसांची धाड! भगवान जाधव उर्फ (भगा) यावर कारवाई.

 

● देशी विदेशी दारू साठा जप्त… पोलिसांची गाडी बघताच दुसरा विक्रेता फरार….ड्युब्लिकेट दारू पासून सावध राहा.

 

● थांब रे दारूविक्या तुझ्यावरही लक्ष? कार्यक्रम होईल वेळेवर….बिल्दी फाट्यावर नजर

 

प्रतिनिधी:जळगाव पाचोरा हायवेवर बिल्दी फाट्यावर सर्रासपणे कुणालाही न घाबरता अवैधपणे टपरीवर देशी, विदेशी दारू विकणाऱ्या बिल्दी येथील भगवान बळीराम जाधव उर्फ (भगा) या इसमावर पाचोरा पोलिसांनी धाड टाकली असता सदर इसमाकडे अवैध पणे दारू विक्री करतांना आढळून आल्याने सदर मद्य विक्री प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम अंतर्गत 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी,योगेश पाटील व अशोक हटकर यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यापूर्वीही पाचोरा पोलीस स्टेशन त्याचबरोबर दारूबंदी विभागाच्या वतीने सदर व्यक्तीवर अवैधपणे मद्यसाठा बाळगणे त्याचबरोबर विक्री करणे याबाबत गुन्हा दाखल केला होता तरी देखील हा दारू विक्रेता कोणालाही न घाबरता दारू विकत होता परंतु आता पोलीस दादांनी याचा चांगलाच बंदोबस्त केला आहे. यानंतर सदर दारू विक्री आढळून आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मोठी कारवाई होईल असे देखील पोलिसांनी या ठिकाणी सांगितले आहे सदर करावी बाबत ग्रामस्थांनी पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.

 

● सदर बहुळा नदीवरील फाट्यावर अवैध पणे दारू विक्री होत असल्याने रात्री अपरात्रीया मद्यपिणाऱ्या इसमांची या गावाच्या फाट्यावर नेहमीच गरड असते. गावठी दारूमुळे अनेक निष्पाप बळी या ठिकाणी मरण पावले असून अनेक जणांचे रस्त्यावर अपघात देखील या पंचक्रोशीतील नागरिकांचे गावठी मदय विक्रीमुळे झाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.