विजय बनछोडे यांची विश्वचषक खो खो स्पर्धा चा मीडिया इन्चार्ज म्हणून नियुक्ती
नवी दिल्ली: नाशिकच्या विजय बनछोडे यांची पहिल्या खो-खो विश्वचषकासाठी मीडिया इन्चार्ज म्हणून नियुक्ती झाली आहे. क्रीडा व्यवस्थापन, प्रशिक्षक म्हणून केलेली सेवा आणि संघटन कौशल्यामुळे बनछोडे यांना ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश समितीच्या क्रीडा अध्यक्ष आणि सचिवपदाची जबाबदारी सांभाळत क्रीडा विकासात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. बनछोडे यांना खेळाच्या आयोजनापासून माध्यमांशी संवाद साधण्यापर्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी लागत आहे.
क्रीडा क्षेत्रातील योगदान:
विजय बनछोडे यांनी २००५ ते २०१६ या अकरा वर्षांच्या कालावधीत राज्यस्तरीय, शालेय, आणि विद्यापीठीय स्तरांवरील खेळाडूंना प्रशिक्षित करून त्यांना राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. नाशिक जिल्ह्यातील अंडर-14, अंडर-18, आणि वरिष्ठ गटांसाठी मार्गदर्शन. स्वप्नील चिकणे (वीर अभिमन्यू पुरस्कार विजेता), दर्शन भाबड, आणि सागर कटारे यांसारख्या खेळाडूंचा विकास. राज्य आणि विद्यापीठ स्तरांवरील स्पर्धांमध्ये प्रशिक्षक आणि सिलेक्टर म्हणून काम. केटीएचएम महाविद्यालयाला राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांकावर पोहोचवले. सुंठा विद्यालय अंडर-14 संघाने द्वितीय आणि चतुर्थ क्रमांक मिळवला. परभणी येथे २०१९ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे निवड समिती सदस्य म्हणून काम केले.
युवक विकासासाठी प्रेरणा:
मुंबई पोलीस आणि नाशिक पोलीस दलासाठी खेळाडू घडवण्यात त्यांनी केलेले योगदान, तसेच राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करण्यासाठी दिलेलं मार्गदर्शन, यामुळे बनछोडे हे खो-खो ला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत.
या सर्व काळात उल्लेखनीय ठिकाणी काम करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम
भारतीय खोखो महासंघाचे महासचिव आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ. चंद्रोदय जाधव सर, खजिनदार गोविंद शर्मा सर यांचे कायमच मनापासून आशीर्वाद लाभले…