चोपडा महाविद्यालयात ‘वार्षिक स्नेहसंमेलनाचे’ उत्साहात उदघाटन
चोपडाः येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात आज दि.१५ जानेवारी २०२५ रोजी आयोजित ‘वार्षिक स्नेहसंमेलनाचे’ उदघाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य मा.राजेंद्र नन्नवरे तसेच अहिराणी लोकसाहित्य अभ्यासक व धुळे येथील सुप्रसिद्ध गझलकार प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी यांच्या हस्ते माजी शिक्षणमंत्री कै. मा.ना. अक्कासो. सौ.शरच्चंद्रिका सुरेश पाटील तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुरेल स्वागत गीताने करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी चोपडा येथील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. कविता भीमराव सुर्वे, चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसाद अशोक पाटील तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी,
उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल,
उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य डॉ. ए.बी.सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.एस.पी.पाटील, पर्यवेक्षक श्री.ए.एन.बोरसे, कनिष्ठ विभागाचे समन्वयक श्री.पी.एस.पाडवी आणि कनिष्ठ विभागाचे स्नेहसंमेलन प्रमुख श्री.एन.बी. शिरसाठ तसेच वरिष्ठ विभागाचे स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.पी.के.लभाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक श्री. राजेंद्र नन्नवरे उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, ‘स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण, समन्वय, सांघिक भावना या गोष्टींचा विकास होतो. सकारात्मक भूमिका घेऊन समाजाच्या नवनिर्माणासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यायला हवे. सामाजिक दायित्व जोपासून समर्पण भावनेने कार्य करावे. समाज सुसंस्कारी व सुसंस्कृत बनविण्यास हातभार लावावा.’
यावेळी खानदेशी अहिराणी साहित्याचे अभ्यासक व धुळे येथील सुप्रसिद्ध गझलकार प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी अहिराणी बोलीतून विनोदी गझल, शेरोशायरी कवितांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. सद्यस्थितीवर गझल काव्याच्या माध्यमातून प्रकाश टाकला. यावेळी ते म्हणाले की, आपल्या भाऊ, मायबाप, नातेवाईक यांची मान खाली जाणार नाही, याची काळजी आजच्या तरुणांनी घेतली पाहिजे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेत जीवन जगले पाहिजे. नात्यातील पवित्र्यता टिकविली पाहिजे.यावेळी त्यांनी कविता सातशे वर्ष जात्याभोवती फिरत होती, हर साल किसान बीज बोया करता है, अशी कशी तू रेंज सोडिलेस, मले सांगे येसू भेटायले, बरसते सुख घरीदारी मुलीचा बाप झाल्यावर, जिले नई लेक ती रडस घयघये, माझ्या डोळ्यातली आसवं पुसताना, उरी हुंदका दाटतो गोष्ट बापाची सांगतांना, मले तूच सुंदर दिखेस पयले पयले, पाया पडून त्यांच्या थोर झालो, बदलून गेलो बंडखोर झालो अशा एकापेक्षा एक सरस गझल कवितांचे सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले व खिळवून ठेवले.या कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा समाज विकासासाठी फायदा व्हायला हवा.विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला तर त्यांच्यातील आत्मविश्वास वाढेल व त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होऊन योग्य दिशा मिळेल.’
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. सुनीता पाटील व सौ. कांचन पाटील यांनी केले तर आभार कनिष्ठ विभागाचे स्नेहसंमेलन प्रमुख श्री.एन. बी. शिरसाठ यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मेहंदी, रांगोळी व पाककला तसेच आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. रांगोळी, पाककला व मेहंदी या स्पर्धांचे उदघाटन चोपडा येथील पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. कविता सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसाद अशोक पाटील यांच्या हस्ते ‘आनंद मेळाव्याचे’ उदघाटन करण्यात आले.