“आय लव्ह पाचोरा दिनदर्शिका” 2025 च आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते मोठया दिमाखात प्रकाशन

“आय लव्ह पाचोरा दिनदर्शिका” २०२५ च आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते मोठया दिमाखात प्रकाशन

 

पाचोरा तालुक्यातील पत्रकारांचे आय लव्ह पाचोरा दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन पाचोरा-भड़गाव विधानसभेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते मोठया दिमाखात पत्रकारांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार शेलकर, तालुका सल्लागार लक्ष्मण आबा सूर्यवंशी, कार्याध्यक्ष राहुल महाजन, शहर अध्यक्ष प्रविण बोरसे, शहर उपाध्यक्ष प्रशांत येवले, शहर संघटक दिलीप परदेशी, शहर सचिव निखिल मोर, जावेद शेख, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.

 

पाचोरा तालुक्यातील पत्रकार समाजउपयोगी कार्यक्रम व उपक्रम करत असतात. आय लव्ह पाचोरा पत्रकार दिनदर्शिका २०२५चे पहिले वर्ष प्रकाशन करण्यात आले असून, सर्वांशी संपर्क साधणे, 12 पानांवर जाहीरातींसह विविध प्रकारची माहिती संकलीत करणे, संकलीत झालेली माहिती दिनदर्शिकेत उत्तम प्रकारे छापुन आणणे ही कामे सोपी नाहीत. त्यासाठी पत्रकार “प्रवीण बोरसे” आणि पत्रकार “दिलीप परदेशी” यांनी जबाबदारी पार पाडली.

 

आय लव्ह पाचोरा नावाप्रमाणेच तालुक्यातील प्रमुख पत्रकारांनी  एकत्र येत एकजूट दाखवली. त्यामुळेच ही दिनदर्शिका आज प्रकाशित होत आहे, असे म्हणत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आय लव्ह पाचोरा पत्रकार दिनदर्शिका २०२५चे कौतुक करत सर्व पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे, सुनील शिंदे, उपस्थित होते.