महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस निमित्त पाचोरा रोटरी क्लब तर्फे रक्तदान शिबिर 

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस निमित्त पाचोरा रोटरी क्लब तर्फे रक्तदान शिबिर

 

पोलीस स्थापना दिवस निमित्त* *पाचोरा रोटरी चे रक्तदान शिबिर

 

पाचोरा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव यांचे तर्फे पोलीस ठाणे पाचोरा येथे आज दिनांक 8 जानेवारी 2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव शाखेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात 75 रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे स्वैच्छेने रक्तदान केले.

 

पाचोरा प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या हस्ते प्रथम रक्तदात्याची नोंदणी करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. पाचोरा पोलीस ठाण्यातर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सेक्रेटरी डॉ. शिवाजी शिंदे, प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. गोरख महाजन, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, उपनिरीक्षक योगेश गणगे, उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, सहाय्यक उपनिरीक्षक परशुराम दळवी तसेच होमगार्ड तालुका समादेशक चंद्रकांत महाजन, पलटण नायक लक्ष्मण पाटील, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव ठाकरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सतीश टाक, वैद्यकीय अधिकारी अमित साळुंखे उपस्थित होते.

 

*पिंकी जीनोदिया हिने रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले*

*येथील आदर्श मेडिकलचे संचालक कै. कन्हैय्यालाल प्रजापत यांचे आठ डिसेंबर रोजी दुःखद निधन झाले. वडिलांच्या स्मृतीच्या एक महिना प्रत्ययर्थ श्रद्धांजली अर्पण करताना कन्हैयालाल प्रजापत यांची सुकन्या सौ. पिंकी जिनोदिया यांनी शिबिरात प्रथम रक्तदान करून महिलांसाठी वेगळा आदर्श निर्माण केला.*

 

प्रांत अधिकारी भूषण अहिरे यांचे सह, पोलीस निरीक्षक अशोक पवार, पाचोरा पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी, रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष डॉक्टर पवनसिंग पाटील, रोटरी क्लबचे अन्य वैद्यकीय क्षेत्रातील सदस्य यांनी स्वेच्छा रक्तदान केल्याने शिबिरात इतरांनीही उस्फूर्तपणे रक्तदान करून शिबिर यशस्वी केले. या शिबिर प्रसंगी तालुक्यातील पोलीस पाटील, महिला व पुरुष होमगार्ड, पोलीस अधिकारी, कर्मचारी, महसूल अधिकारी व कर्मचारी, महिला व स्त्री पोलीस पाटील यांचेसह नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.

 

या शिबिराला रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत लोढाया, राजेश मोर, भरतकाका सिनकर, डॉ.

घनश्याम चौधरी, डॉ. मुकेश तेली, डॉ.अजयसिंग परदेशी, डॉ. तौसिफ खाटीक, डॉ. राहुल काटकर, इंजी. गिरीश दुसाने, निलेश कोटेचा, पिंकी जीनोदिया, प्रदीप पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अमोल जाधव, डॉ. बाळकृष्ण पाटील, चंद्रकांत पाटील सर, आदी रोटरी सदस्य उपस्थित होते.

 

इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव शाखेच्या वतीने रक्त संकलक अधिकारी डॉक्टर प्रकाश जैन दिनेश कांबळे सीमा शिंदे किरण बाविस्कर व अन्वर खान यांनी सहकार्य केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी पाचोरा पोलीस ठाण्याचे दीपक पाटील, योगेश पाटील, भोजराज धनगर, योगेश शिंपी, होमगार्ड कपिल पाटील आदींनी परिश्रम घेतले.