मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील फरारी आरोपींना पकडून देणाऱ्यास बीड पोलिसांतर्फे जाहीर ईनाम

मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील फरारी आरोपींना पकडून देणाऱ्यास बीड पोलिसांतर्फे जाहीर ईनाम

 

(सुनिल नजन चिफब्युरो/स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) ‌‌ संपूर्ण महाराष्ट्रातून बीड पोलिस दलावर टीकेची झोड उठलेल्या आणि जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलेल्या केज तालुक्यातील मस्सा जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे संशयित मारेकरी शोधून देणाऱ्यास बीड पोलिसांतर्फे जाहीर ईनाम देण्यात येणार असल्याचे बीड जिल्ह्यातील पोलिसांनी जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आश्वासन बीड जिल्ह्यातील पोलिसांनी जनतेसाठी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमुद केले आहे.(1) सुदर्शन चंद्रकांत घुले वय वर्षे( 27), राहणार ‌टाकळी, तालुका, केज , जिल्हा बीड ( 2)क्रुष्णा शामराव आंधळे, वय वर्षे (30)राहणार ,मैदवाडी तालुका धारुर, जिल्हा बीड,(3)सुधिर ज्ञानोबा सांगळे वय वर्षे(23),राहणार टाकळी, तालुका ,केज जिल्हा, बीड अशी फरार आरोपींची नावे आहेत. बीड जिल्ह्यातील केज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 637/2024, भारतीय न्याय संहिता कलम 103(2),140(1),126,118(1),34(4),324 (4),(5),189(2),190 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वरील संशयित आरोपींनी खुनासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून ते फरार झाले आहेत. पोलिसांनी जंग जंग पछाडले तरीही ते सापडत नाहीत.त्यामुळे पोलिस दलातर्फे महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येते की वरील फोटोतील व्यक्ती कोणालाही कोठेही दिसल्यास किंवा त्यांच्या ठावठिकाण्या बाबद काही माहिती असल्यास ताबडतोब वरील नंबरवर संपर्क साधावा आणि पोलिसांना आरोपींची माहिती कळवावी . माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल व पोलीस दलातर्फे योग्य ते ईनाम देण्यात येईल असे बीड जिल्ह्यातील पोलिस दलातर्फे जाहीर करण्यात आले आहे. पोलिस नियंत्रण कक्ष बीड (02442)222333, (02442)222666, मोबाईल नं. 7249089102, टोल फ्री क्रमांक 112 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नवनित काॅवत यांनी केले आहे. त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर 9560409489, आणि त्यांचे सहकारी सचिन पांडकर,अप्पर पोलीस अधिक्षक बीड,मो. 8275046070, चेतना तिडके,अप्पर पोलीस अधिक्षक अंबेजोगाई मो.9004428152 कमलेश मिना सहायक पोलिस अधीक्षक केज,मो. 9013661808, उस्मान शेख, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग बीड मो.8888667888 यांच्या नंबरवर संपर्क साधावा असे बीड जिल्ह्यातील पोलिसांतर्फे सर्व सामान्य नागरिकांना कळविण्यात आले आहे.वरील आरोपी हे नेपाल ला गेल्याची कुजबुज सर्वत्र ऐकू येत आहे.