पिंपळगाव (हरे.) व परिसरात रोवला मानाचा तुरा; संजयजी झेरवाल सर “अनुभूती महागौरव” पुरस्काराने सन्मानित 

पिंपळगाव (हरे.) व परिसरात रोवला मानाचा तुरा; संजयजी झेरवाल सर “अनुभूती महागौरव” पुरस्काराने सन्मानित

 

पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा

ग्रामविकास मंडळ संचलित ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे आदर्श शिक्षक तथा पद्मवंशीय तेली समाज मंडळाचे सहकोषाध्यक्ष संजय सुकलाल झेरवाल सर यांना टीएमजी क्रिएशन अँड इनोव्हेटिव प्रकाशन मुंबई यांनी सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय “अनुभूती महागौरव” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले.

 

आदरणीय संजय सुकलाल झेरवाल सर हे गेल्या कित्येक वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. यापूर्वीही अनेकदा त्यांच्या कार्याची दखल समाजाने तथा विविध संघटनेने घेऊन त्यांना सन्मानित केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले व आज त्यांचे बरेच विद्यार्थी हे विविध राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. समाजासाठी तसेच शाळेसाठी, गावासाठी त्यांचे अनेक उल्लेखनीय कामे आहेत. हुशार कर्तुत्ववान मेहनती अशी छबी असलेले झेरवाल सर हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत.

 

या मिळालेले पुरस्काराचे श्रेय ते आपल्या समाजाला, शाळेला, गावाला तसेच सहकारी मित्रांना देतात.

 

सदर पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.