होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त पाचोरा युनिट तर्फे हुतात्म्यांना मानवंदना देऊन केले श्रमदान 

होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त पाचोरा युनिट तर्फे हुतात्म्यांना मानवंदना देऊन केले श्रमदान

 

6 डिसेंबर होमगार्ड वर्धापन दिवस याचे उचित साधून होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त पाचोरा तालुका युनिट होमगार्ड संघटनेतर्फे हुतात्म्यांना मानवंदना देऊन वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले जसे की शहरात पदसंचालन तसेच पोलीस परेड ग्राउंड वर श्रमदान व पूर्ण तालुक्याचे ग्रामदैवत असलेले खंडोबा महाराज मंदिर काकणबर्डी पाचोरा येथे यात्रेनिमित्त भाविकांकडून घाण कचरा होमगार्ड संघटनेमार्फत श्रमदानाने मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला

यामध्ये पाचोरा तालुका होमगार्ड युनिटचे तालुका समादेशक श्री चंद्रकांत भीमराव महाजन

वरिष्ठ फलटण नायक श्री रवींद्र भीमराव पाटील ,फलटण नायक श्री लक्ष्मण पाटील, श्री जितेंद्र कासार, श्री मनोज पाटील तसेच कंपनी सार्जंट मेजर राजेंद्र पाटील रोहिदास पाटील सार्जंट मनोज गोसावी विभाग नायक कपिल पाटील मनोज पाटील आणि सर्व होमगार्ड कर्मचारी बंधूंनी विशेष परीक्षण घेऊन महाराष्ट्र होमगार्ड वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.