नवजीवन विद्यालय पाचोरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन
मागास विद्यार्थी शिक्षण मंडळ संचलित नवजीवन विद्यालय पाचोरा येथे दिनांक ६ डिसेंबर महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास पाटील सर व विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना दिली. यानंतर विद्यालयातील इ. ७ वी वर्गातील विद्यार्थिनी श्रेया विलास पाटील, तन्वी ज्ञानेश्वर पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याविषयी भाषण सादर केले. यानंतर विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी विविध प्रेरणादायी विचार ऑनलाइन पद्धतीने ऐकवण्यात आले. विद्यालयातील एस ए पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत या प्रेरणादायी विचारांचा अवलंब आपल्या जीवनात करण्यास सांगितले. यानंतर अध्यक्षीय भाषणात विकास पाटील सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष व त्यांचे कामगिरी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास पाटील, एस ए पाटील, आर ए साळुंखे, सुधाकर पाटील, श्रीमती ज्योती मोरे जगदीश पाटील, सुनील परदेशी, मनोज पाटील, प्रमोद पाटील, सुधीर पाटील, अमोल पाटील, जगन्नाथ निकम, कैलास राठोड यासह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुधाकर पाटील यांनी केले.