महाराष्ट्रातील विधानसभेत बाविस पैकी पाच आमदार करोडपती तर सतरा आमदार कोट्यधीश?

महाराष्ट्रातील विधानसभेत बाविस पैकी पाच आमदार करोडपती तर सतरा आमदार कोट्यधीश?

 

(सुनिल नजन”चिफ ब्युरो”अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक वीस नोव्हेंबर 2024 रोजी पार पडली.त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात 288 पैकी बावीस वेगवेगळ्या मतदारसंघातून महिला आमदार या निवडून आलेल्या आहेत. त्यामधे पाच आमदार करोडपती तर सतरा आमदार कोट्यधीश आहेत. उमेदवारीअर्ज दाखल करताना त्यांनीच ही माहीती आपल्या अर्जावर सही करून भरली आहे. त्यामध्ये करोडोंची संपत्ती असणाऱ्या पाच महिला आमदार आहेत.त्यापैकी 1) नाशिक मध्य मतदारसंघातून भाजपच्या देवयाणी फरांदे या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 13 करोड रूपये, 2)अमरावती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 8 करोड रूपये, 3)देवळाली मतदारसंघातून भाजपच्या सरोज अहिरे या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 3 करोड रूपये, 4)श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 3 करोड रूपये, 5) वसई मतदारसंघातून भाजपच्या स्नेहा दुबे या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 1करोड रूपये आहेत. या पाच आमदार करोडपती महिला आमदार असल्याचे त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे. आता कोट्यधीश महिला आमदार ,6) पर्वती मतदारसंघातून भाजपच्या माधुरी मिसाळ या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 96 कोटी रूपये, 7)कल्याण पूर्व मतदारसंघातून भाजपच्या सुलभा गायकवाड या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 75 कोटी रूपये, 8) केज मतदारसंघातून भाजपच्या नमिता मुंदडा या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 48 कोटी रुपये,9) गोरेगाव मतदारसंघातून भाजपच्या विद्या ठाकूर या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 35 कोटी रुपये,10)जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 34 कोटी रुपये,11) नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या सिमा हिरे या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 29 कोटी रूपये,12)भोकर मतदारसंघातून भाजपच्या श्रीजया चव्हाण या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 28 कोटी रुपये,13)अणुशक्ती नगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सना मलिक या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 22 कोटी रूपये,14)कन्नड मतदारसंघातून शिवसेनेच्या संजना जाधव या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 15 कोटी रुपये,15) धारावी मतदारसंघातून काँग्रेसच्या डाॅ ज्योती गायकवाड या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 12 कोटी रूपये,16)फुलंब्री मतदारसंघातून भाजपच्या अणुराधा चव्हाण या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 11कोटी रूपये,17) शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून भाजपच्या मोनिकाताई राजळे या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 11कोटी रूपये,18)बेलापूर मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हाञे या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 9 कोटी रुपये,19)साक्री मतदारसंघातून शिंदे शिवसेनेच्या मंजुळा गावित या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 7 कोटी रूपये ,20) चिखली मतदारसंघातून भाजपच्या श्वेता महाले या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 7 कोटी रुपये,21)दहिसर मतदारसंघातून भाजपच्या मनिषा चौधरी या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 5 कोटी रूपये ,22) कारंजा मतदारसंघातून भाजपच्या सई डहाके या निवडून आलेल्या आहेत त्यांच्याकडे 4 कोटी रूपये रोख रक्कम आहे.या आहेत महाराष्ट्रातील विधानसभेतील नवनिर्वाचित 22 महिला आमदार व त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम. ही माहीती त्यांच्याकडूनच उमेदवारी अर्ज भरताना संबधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेली आहे.ही फक्त रोख रक्कम आहे.यामध्ये जड जवाहर ,सोने नाणे,चांदी,जमीन, प्लाॅट, बंगले गाड्या यांचा समावेश नाही ते वेगळेच आहेत. तसेच शासनाकडून मिळणाऱ्या सवलती चा लाभ घेऊन या महिला आमदार जनतेची सेवा करीत आहेत.