ब्राह्मणीच्या प्रियकरान त्रासदायक प्रेयसीचा सुपारी देऊन काढला काटा,मग पोलीसांनी दाखवल्या मिञासह गजाआड होण्याच्या वाटा!
(सुनिल नजन ” चिफ ब्युरो”/अहिल्यानगर जिल्हा स्पेशल क्राईम रिपोर्टर) अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील फिटर असलेल्या प्रियकरान सतत पैशासाठी ञास देणाऱ्या प्रेयसीचा सुपारी देऊन काढला कायमचा काटा,मग धाराशिव पोलीसांनी दाखवल्या मित्रासह गजाआड होण्याच्या वाटा. या बाबदची माहीती अशी की ब्राह्मणी येथील फिटर असलेला विश्वास नामदेव जरे याचे गावातीलच एका (30)वर्ष वयाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते.सध्या ती नेवासाफाटा परीसरात रहात होती.जरे यास पैशासाठी ती सारखा ञास देत होती.पैसे दिले नाहीतर तुला बलात्काराच्या गुन्ह्य़ात अडकवून जेलमध्ये टाकीन अशी धमकीही ती देत होती. मग जरे याने आपल्याच तिन
मित्रांबरोबर आपल्याला तुळजापूरला देवदर्शनासाठी जायचे आहे असा निरोप शनिवार दिनांक16 नोव्हेंबर रोजी आपल्या प्रेयसीला दिला. व त्याच दिवशी नेवासाफाटा येथुन राञी 9 वाजता स्वीप्ट कारमधून हे सर्व जण नेवासाफाटा, घोडेगाव, अहमदनगर,कडा,आष्टी, जामखेड, खर्डा, आंबी मार्गे सोनारी गावाच्या पुढे असलेल्या नदीच्या पुलावर राञी 3 वाजण्याच्या सुमारास आले.गाडी तेथे थांबवली आणि तेथेच ती झोपेतच असतानाच तीचा उपरण्याच्या सहाय्याने गळा आवळला.पण ती मेली नसल्याने तीच्या डोक्यात दगड घालून जीवे ठार मारून पुरावा नष्ट करण्या करीता तीला पुलावरून खाली पाण्यात टाकुन दिले व हे सर्व जण माघारी आले. दुसर्या दिवशी म्हणजे रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आंबी ता.परांडा जिल्हा उस्मानाबाद (धाराशिव) येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत परांडा – सोनेरी रस्त्यावर हरणवाडा येथील ओढ्यात एका अज्ञात महिलेचे प्रेत पोलीसांना आढळून आले. तीचे अंदाजे वय 30 वर्षे होते.तीच्या डाव्या हातावर “प्रकाश ” असे गोंदलेले होते. आदल्याच दिवशी राञी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून सदर महिलेच्या शरीरावर,डोक्यावर, हत्याराने वार करून जखमी केले होते व पांढऱ्या रंगाच्या उपरण्याने गळा आवळून तीचा खून केला होता.तसेच सदर म्रुतदेह पुलावरून ओढ्यातील पाण्यात टाकुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी आंबी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रामकिसन कुंभार यांनी दाखल केलेल्या प्रथम खबरी वरूनच आंबी पोलीस ठाण्यात रविवार दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी काही पोलीस पथके तैनात करून परिसरातील दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्यातील फुटेज तपासले असता त्यांना स्वीफ्ट कार डिझायर वाहनामधून हा सारा प्रकार झाला असल्याचे समजले.सदर वाहन हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथील संदिप उत्तम तोरणे वय वर्षे (34) याचे असल्याचे समजताच पोलिसांनी पढेगाव येथे जाऊन तोरणे यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर महिला ही मुळ राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील आहे.तीचे गावातील च गाड्याचा फिटर असलेल्या विश्वास नामदेव जरे याच्या सोबतच प्रेम प्रकरण सुरू होते. ती सध्या नेवासाफाटा परीसरात रहात होती. हा फिटर ही काही दिवस नेवासाफाटा येथे दुसर्याच्या दुकानात पार्टनर म्हणून काम करत होता.त्याने आता स्वतःचे गाड्या फिटींगचे दुकान ब्राह्मणी गावातच सुरू केले होते. सदर महिला ही जरे यास सतत पैशाची मागणी करून ञास देत होती असे जरे याचे म्हणणे होते.तीच्या सततच्या छळाला फिटर विश्वास नामदेव जरे हा पुर्णपणे वैतागून गेला होता.मग फिटर विश्वास जरे याने वाहनचालक संदिप तोरणे (वय34) रा.पढेगाव,ता. श्रीरामपूर, सोमनाथ रामनाथ कराळे वय (27),महेश कुंडलिक जाधव वय(19) दोघे राहणार ब्राह्मणी तालुका राहुरी जिल्हा नगर यांना सदर महिलेचा कायमचाच काटा काढण्यासाठी (92,000) बॅनो हजार रूपयाची सुपारी दिली होती.व तीला लांब नेहुण फेकून द्या असे सांगितले होते.त्या प्रमाणे सर्व झालेही होते. पण “कानुन के हात बहुत लंबे होते है” हे धाराशिव पोलीसांनी दाखवून दिले होते.तोरणे याने दिलेल्या माहिती नुसार पोलीसांनी वरील तिघांना नेवासा तालुक्यातील सोनई परिसरातील वंजारवाडी येथुन ताब्यात घेऊन झालेल्या गुन्ह्य़ाबाबद तिघांकडेही विचारपूस केली असता सदर गुन्ह्य़ाबाबद घडलेल्या सर्व प्रकारच्या गुन्ह्य़ाचा कबुली जबाब त्यांनी पोलीसांना दिला आहे. सदर गुन्ह्य़ाबाबदचा तपास धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे,सचिन खटके,सुदर्शन कासार, पोलीस हवालदार विनोद जाणराव, शौकत पठाण, प्रकाश औताडे,अमोल निंबाळकर,जावेद काझी, फरहान पठाण, समाधान वाघमारे, पोलीस नाईक नितीन जाधवर,बबन जाधवर,प्रकाश बोईनवाड,विनायक दहीहंडे,यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांनी हा तपास लावण्यात यश मिळवले आहे.आणि चार ही आरोपीं विरुद्ध कडक कारवाई करून त्यांना गजाआड केले आहे.