के सी ई इंजिनीरिंग आणि व्यवस्थापन कॉलेज तर्फे दोन दिवसीय इंटरनॅशनल कॉन्फरेन्स चे आयोजन

के सी ई इंजिनीरिंग आणि व्यवस्थापन कॉलेज तर्फे दोन दिवसीय इंटरनॅशनल कॉन्फरेन्स चे आयोजन

 

 

के सी ई इंजिनीरिंग आणि व्यवस्थापन कॉलेज तर्फे दोन दिवसीय इंटरनॅशनल कॉन्फरेन्स चे आयोजन : – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेन्ट महाविद्यालय व इन्स्पिरा रिसर्च असोसिएशन जयपुर ,राजस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने मल्टिडिसिप्लिनरी इनोवेशनं अँड चॅलेंजेस इन अकॅडमिक रिसर्च (आय सी आय सी ए आर व्हर्चुअल२०२४ ) या आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय संशोधन परिषद दिनांक १४ व १५ ऑक्टो २०२४ ला घेण्यात आली . यात व्यवस्थापन ,वाणिज्य ,अभियांत्रिकी ,आर्टीफिसिअल इंटेलिजन्स ,अश्या बहुविद्याशाखीय दृष्टीकोनावर अभ्यासपूर्ण मंथन झाले . या परिषदेत भारत व भारताबाहेरील १२० प्राध्यापक ,विद्यार्थी ,व संशोधकांनी शोध निबंध सादर केले . कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी इन्स्पीरा (आय आर ए) चे जनरल सेक्रेटरी प्रा. डॉ रविकांत मोदी यांनी स्वागत पर भाषण केले . इन्स्पीरा चे अध्यक्ष प्रा डॉ एस एस मोदी आणि के सी ई सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी प्रस्तावना सादर केली . पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे डॉ मेघा ( संगणक विभाग , लॉंन्गवेज अँड सिस्टिम्स युनिव्हर्सिटी ऑफ स्पेन ) आणि डॉ रमेश पांडा ( प्रमुख शास्रज्ञ वेग्रो इंडिया रिसर्च अँड इनोवेशन पेटंट होल्डर ) यांनी उपस्थिती दिली . प्रमुख प्रवक्ते म्हणून डॉ अल्बट अहमद (अधिव्यख्याता मेडन पॉलीटेक्नीक ऑफ टुरिझम नॉर्थ सुमात्रा ,इंडोनेशिया ) आणि डॉ पूनम (सहयोगी प्राध्यापक ,व्हॉइस प्रिन्सिपॉल युनिव्हर्सिटी कॉमर्स कॉलेज ,युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान जयपूर )यांनी मत मांडले . प्रा डॉ किन्नरी ठक्कर (डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई सांताक्रूझ ) आणि उपाध्यक्ष म्हणून डॉ बलजीत कौर (सहयोगी प्राध्यापक ,युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली )यांनी काम पहिले . दुसऱ्या दिवशी प्रमुख प्रवक्ते म्हणून डॉ आझमत मकसुदेंव (सहयोगी प्राध्यापक , डिपार्टमेंट ऑफ बिसनेस ऍडमिनिस्ट्रेशन तुर्किश मानस युनिव्हर्सिटी ),डॉ लकवींदर कौर (प्रोफेसर ,फूड सायन्स अँड टेक्नोलोंजि ,फरिदाबाद),डॉ सुनीता (सहयोगी प्राध्यापक ,वेमना इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलोंजि कोरमंगल ,बंगलोर ),यांनी मत मांडले .प्रो. डॉ अनिल मेहता (प्रोफेसर ऑफ मॅनेजमेंट ,बनस्थली ) आणि उपाध्यक्ष म्हणून डॉ रिचा अशोक मोदियानी ,सहयोगी प्राध्यापक एस एस बी टि इंजिनीरिंग अँड टेक्नोलोंजि बांभोरी ,जळगाव )यांनी काम पहिले . डॉ रविकांत मोदी उत्कृष्ट शोध निबंध सादरीकरण घोषित करण्यासाठी परीक्षक लाभले . १२ सहभागी संशोधकाना उत्कृष्ट शोध निबंध सादरीकरण पुरस्कार देण्यात आला . त्यात महाविद्यालयांची एम बी ए कोर्स ची विद्यार्थिनी कु . गायत्री सुनील चौधरी हिने पुरस्कार पटकावला .आंतर राष्ट्रीय संशोधन परिषद आयोजनासाठी खान्देश कॉलेज ऑफ एज्यु केशन सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत श्री नंदकुमार बेंडाळे सर यांचे मार्गदर्शन मिळाले . परिषदेचे सुत्र संचालन इन्स्पिरा रिसर्च असोसिएशन च्या जॉईन्ट सेक्रेटरी डॉ आरती चोप्रा यांनी केले . आभार प्रदर्शन परिषदेच्या संयोजक आणि महाविद्यालयाच्या प्रा. हर्षा देशमुख यांनी केले . आयोजन समितीतील संयुक्त संचालक डॉ प्रज्ञा विखार ,आयोजन सचिव डॉ सुनील न्याती व प्रा शेफाली अग्रवाल ,सह संयुक्त सचिव डॉ सि एस पाटील व प्रा कल्पेश महाजन आयोजन समिती मधील सदस्य प्रा के बी पाटील ,प्रा प्रसाद कुलकर्णी ,प्रा राहुल पटेल प्रा अविनाश सूर्यवंशी यांनी त्यांच्या पदावर महत्वाची कामगिरी बजावली .