बुद्धिबळ स्पर्धेत श्री.गो.से. हायस्कूलची विद्यार्थिनी ऋतुजा बाल पांडे 6 पैकी 5.5 गुण संपादन

बुद्धिबळ स्पर्धेत श्री.गो.से. हायस्कूलची विद्यार्थिनी ऋतुजा बाल पांडे 6 पैकी 5.5 गुण संपादन

 

 

जळगाव ते नुकत्याच पार पडलेल्या नाशिक विभागीय शालेय 14 वर्षाखालील मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेत श्री.गो.से. हायस्कूलची विद्यार्थिनी ऋतुजा बाल पांडे 6 पैकी 5.5 गुण संपादन करून 23 सप्टेंबर पासून नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेली आहे तिच्या या यशाबद्दल पी.टी सी.संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब श्री संजय वाघ, व्हा. चेअरमन नानासाहेब श्री व्ही.टी.जोशी स्कूल कमिटी चेअरमन दादासाहेब श्री खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन अण्णासाहेब श्री वासुदेव महाजन शाळेचे मुख्याध्यापक श्री एन आर पाटील सर उप मुख्याध्यापक श्री आर एल पाटील सर पर्यवेक्षक श्री ए बी अहिरे सर पर्यवेक्षिका सौ ए आर गोहिल मॅडम सर्व शिक्षक बंधू-भगिनी कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.