सपासप नंग्या तलवारीचे वार अंगावर घेत त्यांनी सांगितले आगामी वर्षांचे भविष्य, महाराष्ट्रात राज्य बदलाचे संकेत मिळाल्याने प्रचंड खळबळ?

सपासप नंग्या तलवारीचे वार अंगावर घेत त्यांनी सांगितले आगामी वर्षांचे भविष्य, महाराष्ट्रात राज्य बदलाचे संकेत मिळाल्याने प्रचंड खळबळ?

 

(सुनिल नजन चिफब्युरो/अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधि) अहिल्यानगर जिल्ह्य़ातील पाथर्डी तालुक्यातील मीरी येथील विरभद्र यात्रेत बिरोबाभक्त सिताराम भगत यांनी सपासप नंग्या तलवारीचे वार अंगावर घेत आगामी वर्षांचे (होईक) भविष्यवाणी सांगत महाराष्ट्रात राज्य बदलाचे संकेत दिले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होत असल्याने या भविष्य वाणीचे विरोधी पक्षांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे.राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि पाथर्डीचे आगामी उमेदवार प्रतापराव ढाकणे,शेवगाव तालुक्यातील माळेगावचे धनगर समाजातील नेते आणि प्रसिद्ध उद्योजक जगन्नाथ गावडे पाटील यांनीही विरभद्र मंदिरात जाऊन दर्शन घेतले. बिरोबाभक्त सिताराम भगत यांनी पुढे सांगितले ” की दिवाळीचा दिवा साजरा होईल, कुठं कुठ चलन फिरल,गोंदण भरल पिडारे वाहिल,कैक हसतील कैक रडतील, सटीच सटवण बांदाआड होईल,दैवाचा राजा दैवान खाईल. दुग्धर येतील मनभाव विकतील,गहु हरबरे जोडीने पिकतील सवाईन विकतील, धरणीकंप होईल, धरणी हादरल, मायेच लेकरू पारख होईल,रक्ताचा पूर वाहिल,जठुडसाधन, गाई हिरव्याला लागतील, आखाडी पडण ,ढगफुटी होईल, इत्यादी भविष्य वर्तविण्यात आले.आसाराम भगत आणि त्यांचे सहकारी यांनी विषेश सहकार्य केले. शिर्डीतील बिरोबाभक्त रतीलाल लोढाकाका यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.ग्रामस्थांच्या वतीने छबिन्यात विरभद्र देवाची पालखी मिरवणूक काढून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा भरविण्यात आला होता. महाराष्ट्रकेसरी गुलाब बर्डे,आदम शेख,बाबासाहेब आंधळे, मनोहर लाड यांचा मीरी ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.यात्राकमेटीच्या वतीने विष्णुपंत सोलाट, गवळी साहेब, अशोक घोंगडे, संतोष सोलाट, मोहन दाणे,मच्छिंद्र शिपनकर, रामदास दाणे, लक्ष्मण सोलाट, जालिंदर गवळी, एकनाथ गवळी, अशोक गवळी, राहुल गवळी, यांनी काम पाहिले. सुञसंचालन जगदीश सोलाट यांनी केले.