गोदावरी फाउंडेशनचे डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयात ताण तणाव मुक्त व कॉपीमुक्त परीक्षा अभियान कार्यक्रम संपन्न

गोदावरी फाउंडेशनचे डॉक्टर उल्हास पाटील विधी महाविद्यालयात ताण तणाव मुक्त व कॉपीमुक्त परीक्षा अभियान कार्यक्रम संपन्न : १८/१०/२०२४

 

डॉक्टर उल्हास पाटील महाविद्यालय जळगाव येथे विद्यार्थ्यांसाठी ताण तणाव मुक्त व कॉपीमुक्त परीक्षा अभियान कार्यक्रम 18 ऑक्टोबर 2024 सकाळी ८:३० वाजता आयोजित करण्यात आला.

 

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक एडवोकेट पूजा व्यास यांनी केले. परीक्षा व मूल्यमापन मंडळ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कडून दिवाळी 2024 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आचारसंहिता देण्यात आलेली आहे. सदर आचारसंहिता विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली तसेच कार्यक्रमाची मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर नयना महाजन यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे व अभ्यासाचे नियोजन करावयाचे सांगून स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला दिला. परीक्षेचा ताण कसा कमी करता येईल यावरही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षाच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवून कसा ताण कमी करावा यावर प्राचार्य डॉक्टर नयना महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्राध्यापकांचे मार्गदर्शन घेण्याचे सुचवले आहे. परीक्षेचे गैरप्रकार व त्यासाठी असलेल्या शिक्षेचे स्वरूपही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी परीक्षा गैरप्रकार व त्याच्या दुष्परिणामांची जाणीव ठेवावी आणि परीक्षा प्रामाणिकपणे द्यावी यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऐश्वर्या आठवले यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व सर्व एलएलबी आणि बीए एलएलबी चे विद्यार्थी उपस्थित होते.