कृषीकन्या वैशालीताई सुर्यवंशींनी ‘सांस्कृतिक आमदार’ व्हावे : संभाजी भगत

कृषीकन्या वैशालीताई सुर्यवंशींनी ‘सांस्कृतिक आमदार’ व्हावे : संभाजी भगत

 

पाचोऱ्यात रंगला ‘संविधानाचा जागर’ कार्यक्रम : हजारोंची उपस्थिती !

 

पाचोरा, दिनांक १६ (प्रतिनिधी ) : ”राजकीय आमदार तर अनेक जण बनतात मात्र कृषीकन्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी ‘सांस्कृतिक आमदार’ बनावे !” अशी अपेक्षा व्यक्त करत लोकशाहीर संभाजी भगत यांनी त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ते पाचोऱ्यात पार पडलेल्या ‘संविधानाचा जागर’ या कार्यक्रमात बोलत होते.

 

शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मंगळवारी पाचोऱ्यात माता श्री कैलादेवी मंदिराच्या बाजूला असलेल्या सावा मैदानात संविधानाचा जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. लोकशाहीर संभाजी भगत यांनी अतिशय उर्जावान पध्दतीत कार्यक्रमाचा शुभारंभ केला. आपल्या ओजस्वी संबोधनातून त्यांनी उपस्थितांना हसता-हसता अंतर्मुख केले. यानंतर वैशालीताई म्हणाल्या की, आपल्याला संविधान बचावची हाक द्यावी लागते ही दुर्दैवाची बाब आहे. देश व राज्याप्रमाणेच पाचोरा मतदारसंघात दहशतीचे वातावरण असून ही लोकशाही नक्कीच नाही. दररोज संविधानाचा खून होत असून आता परिवर्तनासाठी क्रांतीची मशाल हाती घ्यावी लागणार आहे. आमदारांनी कामे मांडतांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, उद्योग, व्यापार आदींविषयी चकार शब्द काढला नसून त्यांना खाली खेचण्याची वेळ आल्याचे वैशालीताई म्हणाल्या. संविधानाच्या बचावासाठी आपण कटीबध्द असून जनतेने यासाठी आपल्याला कौल देण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

लोकशाहीर संभाजी भगत यांनी कार्यक्रमात अतिशय रसाळ निरूपण करतांना वैशालीताई सुर्यवंशी यांचे भरभरून कौतुक केले. खरी क्रांती व परिवर्तन हे महिलांच्या माध्यमातून होत असून ताईंनी ‘सांस्कृतीक आमदार’ बनून सांस्कृतीक सत्ता हाती घ्यावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. तर वैशालीताई या नक्कीच कर्तबगार आमदार बनणार असल्याचा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला. यानंतर या जलशात शाहीर संभाजी भगत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकापेक्ष एक सरस गीते सादर करून उपस्थितांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सादरीकरणाला जोरदार दाद मिळाली. तर, उपस्थितांनी त्यांच्या उर्जावान गीतांवर ठेका धरून आनंदोत्सव साजरा केला. एका अर्थाने मंगळवारची संध्याकाळ ही संविधानाच्या जागरात न्हाऊन निघाली.

 

या संविधान जागर कार्यक्रमाला उध्दव मराठे, रमेश बाफना, अशोक संघवी, शरद पाटील, अभय पाटील, दिपकसिंग राजपूत, राजू काळे, विकास वाघ, हरीभाऊ पाटील, राकेश सोनवणे, खंडू सोनवणे, अनिल सावंत, दादाभाऊ चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, अरूण तांबे, भरत खंडेलवाल, अभिषेक खंडेलवाल, राजेंद्र राणा, पप्पू जाधव, नितीन लोहार अविनाश भालेराव, प्रशांत पाटील, मनोज चौधरी, बंटी हटकर, सुनील शिंदे, राजू मोरे, अरमान तडवील, अमोल साळवे, संदीप जैन, निखील सोनवणे, गुड्डू पाटील, आवेश खाटीक, प्रशांत सोनार, आनंद चौगिरे, पंकज तायडे, विशाल देडे, विशाल बागुल, नितीन खेडकर, हरीश देवरे,ऋषी देवरे, निखील सोनवणे, नितीन खेडकर, सादीक सिरदार, भैय्या हटकर, संतोष पाटील, निखील भुसारे, योजना पाटील, लक्ष्मी पाटील, सविता शेळके, द्वारका सोनवणे, मनीषा पाटील, बेबा पाटील, पुष्पा परदेशी, कल्पना पाटील, निता भांडारकर, रेखा शिरसाठी आदींसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महिला आघाडी, युवासेना, युवती सेना तसेच विविध अंगीकृत आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि संविधान प्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.