एम.एम.महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. युगंधरा राजेंद्रसिंग पाटील हिची जुलै 2024 मध्ये आय.बी.पी.एस. मध्ये सरळ निवड

 

एम.एम.महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. युगंधरा राजेंद्रसिंग पाटील हिची जुलै 2024 मध्ये आय.बी.पी.एस. तर्फे सरळ सेवेद्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत महिला व बालविकास विभागात ‘ पर्यवेक्षिका ‘ या पदावर निवड झालेली आहे. कु. युगंधरा चा शैक्षणिक आलेख सतत उंचावत आलेला आहे. पदवी परीक्षेत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे इंग्रजी विषयात ती सुवर्णपदकाची मानकरी ठरलेली आहे. तिची कुलगुरू मार्फत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘ बोर्ड ऑफ स्टडीज ‘ या विद्यापीठाच्या अभ्यासक्रम तयार करणाऱ्या मंडळावर नेमणूक झाली आहे. तसेच यापूर्वी तिची ‘ पुरवठा निरीक्षक ‘ या पदावर नेमणूक झालेली आहे.तिच्या या यशाबद्दल भाऊसो दिलीप ओंकार वाघ (अध्यक्ष पी.टी.सी. पाचोरा), चेअरमन नानासो संजय ओंकार वाघ , व्हाईस चेअरमन नानासो व्ही.टी. जोशी , संस्थेचे मानद सचिव दादासो महेश एस. देशमुख , महाविद्यालयाचे प्राचार्य , उपप्राचार्य तसेच सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले आहे. ती राजेंद्रसिंग धनसिंग पाटील यांची कन्या असून आरोग्य विभागात कार्यरत श्री नरेंद्र पाटील यांची पुतणी आहे. तिला प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांचे मार्गदर्शन लाभले.