जळगाव जिल्हा खो-खो संघ निवडीसाठी चाचणीचे आयोजन….!!!

जळगाव जिल्हा खो-खो संघ निवडीसाठी चाचणीचे आयोजन….!!!

 

जळगाव – महाराष्ट्र खो-खो असोसियएशन तर्फे आयोजित ५० वी कुमार/मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड चाचणी दिनांक १६/१०/२०२४ रोजी सकाळी ९ वाजता जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे मैदान व.वा.वाचनालय जळगाव येथे घेण्यात येणार आहे, निवड झालेला संघ जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व करेल.

या निवड चाचणीसाठी सहभाग घेणाऱ्या खेळाडूचा जन्म दिनांक २१/११/२००६ रोजी अथवा त्यानंतर जन्मलेला असावा तसेच ग्रॅज्युएशनच्या प्रथम वर्ष पर्यंत शिकत असलेला खेळाडू निवड चाचणीसाठी पात्र राहील सर्व खेळाडूंनी खालील कागदपत्रे सोबत आणावे…

 

१)जन्माचा मुळ (ओरिजनल) दाखला आणणे बंधनकारक राहील तसेच दहावी/बारावी बोर्ड सर्टिफिकेट २)ओरिजनल आधार कार्ड ३) शाळेचे आय कार्ड ४) पासपोर्ट साईज फोटो ५) वजन+ उची+वय=२५० ६)ईमेल आयडी ७)मोबाईल क्रमांक.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी मा आ प्रा चंद्रकांत सोनवणे प्रा डी डी बच्छाव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री गणपतराव पोळ श्री उदय पाटील श्री सुनील सौंदाणे डॉ श्रीकृष्ण बेलोरकर श्री जयांशु पोळ सौ विद्या कलंत्रीयांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हा असोसिएशनचे सचिव राहुल पोळ ९४०४२९२७१४ अनंता सैंदाणे ९४०३५१४५६८ दत्तात्रय महाजन ७०२०७५१८२३ विशाल पाटील-९९७०३०८३२६ दिलीप चौधरी- ९१५८४६९२९४ यांच्याशी संपर्क साधावा.