श्री.गो.से. हायस्कूल.मध्ये शिक्षक- पालक मेळावा संपन्न
आज दिनांक 10 ऑक्टोबर गुरुवार रोजी श्री.गो.से. हायस्कूल. पाचोरा. येथे शिक्षक- पालक मेळावा कलादालन येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला.
मंचावर शिक्षक पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन. आर. पाटील., उपमुख्याध्यापक श्री. आर. एल. पाटील, पर्यवेक्षिका सौ.ए .आर. गोहिल मॅडम ,ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती संगीता एस. पाटील. मॅडम व प्रतिनिधी स्वरूपात श्री. एकनाथ पुंजू पाटील. व महिलांमधून सौ. सुलभा सोनार.उपस्थित होते.
पालक मेळाव्याची सुरुवात शाळेतील संगीत शिक्षक श्री सागर थोरात व रुपेश पाटील यांनी इशस्तवनाने केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. आर. एल. पाटील सर यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्यामधील पालक हा दुवा आहे व आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले.
उपस्थित पालकांपैकी श्री. अमरसिंग चौधरी सर यांनी प्रातिनिधीक स्वरूपात पालकांतर्फे निवेदन केले. श्री. गो.से .हायस्कूल या विद्यालयाचा. ” मुख्यमंत्री माझी शाळा -सुंदर शाळा “या उपक्रमात जळगाव जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल संपूर्ण शाळा व स्टॉप चे हार्दिक अभिनंदन करून शाळेवरती पालकांचा असलेला विश्वास व सहकार्य कायमस्वरूपी राहील असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री.एन. आर.पाटील. सर यांनी उपस्थित पालकांनी मांडलेल्या सूचना व समस्या या संदर्भात निराकरण व उपाय योजना करण्यात येईल व विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळा व शिक्षक यांची बांधिलकी राहील असं आपल्या भाषणातून व्यक्त केले.
शिक्षक पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन श्री आर बी बोरसे तसेच आभार प्रदर्शन श्री रुपेश पाटील सर यांनी केले.