महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे जळगाव सर्कल मधील केंद्रीय पदाधिकारी तसेच विभागीय सचिव/प्रमुख यांची तातडीची बैठक

महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे जळगाव सर्कल मधील केंद्रीय पदाधिकारी तसेच विभागीय सचिव/प्रमुख यांची तातडीची बैठक

 

महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे जळगाव सर्कल मधील केंद्रीय पदाधिकारी तसेच विभागीय सचिव/प्रमुख यांची तातडीची बैठक आज दि* *०६/१०/२०२४ रोजी भुसावळ सोसायटी चे सभागृहात संघटनेचे ऑडिट कमिशन चेअरमन *कॉ.जे.एन.बाविस्कर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संयुक्त सचिव तथा झोन सेक्रेटरी कॉ.विरेंद्र पाटील, केंद्रीय सल्लागार कॉ‌.पी वाय पाटील,* *केंद्रीय कार्यकारिणी सदस्य कॉ.देविदास सपकाळे,कॉ.प्रकाश कोळी,कॉ‌.जितेंद्र अस्वार यांच्या प्रमुख* *उपस्थितीत पुढील विषयावर आयोजित करण्यात आली होती*.

१.) सभासदांच्या समस्या अडिअडचणी व समस्यावर विचार करणे

२.) प्रत्येक विभागात सभासद नोंदणी संघटना मुखपत्र नोंदणी आढावा घेणे.

३.) संघटनात्मक बांधणी बाबत चर्चा करणे

४.) पगारवाढ निधी बाबतीत विचार विनिमय करणे.

५.)रिक्त असलेल्या सर्कल सेक्रेटरी पदी प्रभारी म्हणून नेमणूक करणे

६.) अध्यक्ष यांच्या संमतीने आयत्या वेळी येणारे विषयावर विचार विनिमय करणे.

सदर सभेची प्रस्तावना सुत्रसंचलन कॉ.प्रकाश कोळी यांनी केले.

*सभेच्या सुरुवातीला संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष आणि वीज कामगार कर्मचारी यांचे श्रध्दास्थान कॉ.दत्ताजी देशमुख आणि कॉ ए बी बर्धन यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले*

 

सदर बैठकीत चर्चेला आलेल्या विषयावर

*कॉ.सुनिल सोनवणे यांनी मुक्ताईनगर वार्ता फलक नवीन विभागीय कार्यालयासमोर बसविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले.*

*कॉ गोकुळ सोनवणे यांनी मुक्ताईनगर विभाग चा आढावा सादर केला*

*कॉ.प्रभाकर महाजन यांनी जळगाव विभाग मध्ये येत असलेल्या अडचणी मांडल्या*

*कॉ.सागरराज का़बळे यांनी स्थानिक वरिष्ठ पदाधिकारी यांनी लक्ष घालावे असे आवाहन केले.*

*कॉ.रविद्र गायकवाड यांनी भुसावळ विभागाचे आढावा सादर केला.*

*जितेंद्र अस्वार यांनी सावदा विभाग चा आढावा घेतला २०२४ चा हिशोब दोन दिवस मध्ये यादी सहित सादर करणार आहे असे सांगितले.*

*कॉ.किशोर जगताप विभागीय सचिव जळगाव यांनी जळगाव विभाग चा आढावा सादर केला*

 

*कॉ. विशाल पाटील चाळीसगाव यांनी चाळीसगाव विभाग चा आढावा सादर केला.पगारवाढ निधी संपर्क करून जमा करण्यात येत आहे असे सांगितले*

 

*कॉ.स्वप्निल बाविस्कर यांनी धरणगाव विभाग चा आढावा सादर केला*

*पाचोरा विभाग चा आढावा सादर करण्यात आला*संपर्क करून पगारवाढ निधी बाबतीत कार्यवाही सुरू आहे असे*

*कॉ.चंद्रकांत कोळी,कॉ.विलास तायडे,कॉ दिनेश मोरे यांनी संघटनात्मक व संस्थात्मक पातळीवर कामकाजात येणाऱ्या अडचणी समस्या यावर आपले विचार मांडले*

*सभेस संबोधित करताना कॉ पी वाय पाटील यांनी सांगितले की आपल्या संघटनेची ध्येय धोरणे नुसार कामकाज करणे प्रत्येक सभासद पदाधिकारी यांचे कर्तव्य आहे आणि नेतृत्वाने चांगली पगारवाढ मिळवून दिली आहे त्यामुळे खुल्या मनाने आपण आपला वाटा संघटनेकडे सोपवला पाहिजे*

*कॉ.विरेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की संघटनेचे नेतृत्व सदैव वीज कामगार कर्मचारी* *अधिकारी अभियंता यांच्या जीवनमान* *उंचावण्यासाठी तसेच वीज उद्योगांचे भरभराट झाली तर आपली प्रगती आहे असे सुत्र गृहीत धरून कामकाज करत आहे.खाजगीकरण व फ्रैंचाईझी धोरणास विरोध म्हणून जे काही* *अभ्यास पूर्ण मांडणी करून संघर्ष उभा राहिला आहे त्यामध्ये आपल्या संघटनेचे केंद्रीय नेतृत्वाला सर्व श्रेय आहे.संघटनेचे कामकाज करत* *असताना सभासद पदाधिकारी यांच्या अडचणी समस्या यावर उपाय शोधण्यासाठी कामाशी एकजीव होऊन प्रयत्न करावे लागतात*असे प्रतिपादन केले.* *नुकताच २५ ,२६ सप्टेंबर च्या संपाचे विषयावर प्रशासनाला सकारात्मक विचार करण्यात भाग पाडण्यात आपल्या संघटनेचे केंद्रीय नेतृत्वाला पुढाकार घेऊन यशस्वीपणे निर्णय झाला त्या बाबतीत आपण अभिमान बाळगला पाहिजे असे मत व्यक्त केले*

*कॉ.जे.एन.बाविस्कर यांनी संघटनेचे महत्त्व आणि दैदिप्यमान इतिहास परंपरा आहे याची जाणीव ठेवून एकसंघ राहण्यासाठी आवाहन केले मतभेद असले तरी तत्त्वांचे असावे.मनमोकळी चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे सभासद पदाधिकारी यांना जागृत करणे आवश्यक आहे तसेच पदाधिकारी यांनी वरिष्ठ पदाधिकारी यांच्या शी चर्चा संवाद साधताना सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे.संघटनेत शिस्त पाळणे अत्यावश्यक आहे* *महाराष्ट्र राज्य वीज मंडळ भुसावळ विभाग सहकारी सोसायटी चे स्वीकृत संचालक ( तज्ञ संचालक) म्हणून कॉ विलास तायडे यांच्या संघटनेचे कामकाजात संघटना वाढीसाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न करत आहेत म्हणून निवड करण्यात आली त्यानिमित्ताने कॉ जे एन बाविस्कर यांच्या हस्ते पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला*

 

*नाशिक पारेषण झोन चे नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली असता खडका पारेषण सर्कल सेक्रेटरी म्हणून कॉ अविनाश तायडे यांची कामगिरी उत्तम असल्याने फेरनिवड करण्यात आली त्यानिमित्ताने कॉ पी वाय पाटील यांच्या हस्ते पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला*

*संघटना बांधणी साठी सामुहिक प्रयत्न करण्यात येईल असा निर्धार करण्यात आला*

*रिक्त असलेल्या सर्कल सेक्रेटरी पदावर नियुक्ती करताना सर्व विभागीय सचिव आणि विभागीय प्रमुख तसेच प्रमुख पदाधिकारी यांच्या एकमताने सावदा विभाग मधील कार्यरत प्रधान तंत्रज्ञ कॉ जितेंद्र पंडित अस्वार यांची प्रभारी सर्कल सेक्रेटरी म्हणून नेमणूक करण्यात आली.* *कॉ जे एन बाविस्कर तसेच उपस्थित सर्व सभासद पदाधिकारी यांनी कॉ जितेंद्र अस्वार याचा सत्कार केला*

 

*सदर निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना संघटनेचे सभासद पदाधिकारी यांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली आहे ती संपूर्ण तन मन धनाने पार पाडण्यासाठी मी कटीबद्ध असून आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे असे प्रतिपादन कॉ जितेंद्र अस्वार यांनी केले*

*सभा यशस्वी होण्यासाठी कॉ गिरीश बर्हाटे विभागीय प्रसिद्धी प्रमुख जळगाव,कॉ.गजानन साबळे विभागीय प्रमुख भुसावळ, चंद्रकांत भिसे संचालक भुसावळ पतसंस्था, कॉ.किशोर गलू कोळी डांभुर्णी,कॉ अमोल सुरेश वाणी विभागीय उपप्रमुख मुक्ताईनगर यांनी परिश्रम घेतले*

 

*अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली कॉ देविदास सपकाळे यांनी आभारप्रदर्शन केले*

 

*कॉ.सागरराज कांबळे सर्कल प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन जळगाव*