बंजारा तांडा वस्तीचे रूप पालटण्यासाठी कटिबद्ध मा.आमदार दिलीप भाऊ वाघ यांची ग्वाही

बंजारा तांडा वस्तीचे रूप पालटण्यासाठी कटिबद्ध मा.आमदार दिलीप भाऊ वाघ यांची ग्वाही

 

 

पाचोरा येथे गोर बंजारा मेळावा संपन्न पाचोरा व भडगाव तालुक्यातील बंजारा बांधवांची वस्ती असलेल्या तांडा वस्तीत सुविधांचा अभाव असून नेतृत्वाची संधी मिळाल्यास संपूर्ण तांडा वस्तीत अत्याधुनिक सुविधा देऊन तांड्यांचे रूप पालटणार असल्याची ग्वाही मा.आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी मेळाव्यात दिली.

जारगाव चौफुली भागातील रामदेव लॉन्स मध्ये रविवार दिनांक 6 रोजी पाचोरा व भडगाव तालुक्यातील गोर बंजारा बांधवांचा भव्य मेळावा झाला. अध्यक्षस्थानी मा.दिलीप भाऊ वाघ होते.

या मेळाव्यास मा.संजय नाना वाघ , राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष शालिग्राम मालकर , नितीन तावडे , पी. डी.भोसले , सत्तार पिंजारी , नितीन तावडे , विकास पाटील , अजहर खान , शिवदास पाटील , भगवान मिस्तरी , खलील दादा देशमुख , सतीश आप्पा चौधरी , हारुण देशमुख , रणजीत पाटील , हर्षल पाटील (भडगाव) वासुदेव महाजन , भूषण वाघ , रामेश्वर पवार ,राहुल राठोड , मोरसिंग राठोड , सिताराम पवार ,शिवदास राठोड , हरसिंग चव्हाण ,महिला आघाडीच्या सुचेता वाघ , ज्योती वाघ , सुरेखा पाटील , प्रमिला वाघ यांचेसह पाचोरा व भडगाव तालुक्यातील बंजारा समाजाचे कारभारी , नाईक व मुखीया महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे बंजारा महिला पारंपारिक वेशात पारंपरिक वाद्यावर नृत्य करत मेळावा स्थळी उपस्थित झाल्या. मेळाव्यास विष्णूनगर , हनुमान वाडी , बाळद , मोहाडी ,वडगाव जोगे , कोकडी , वरसाडे , निंभोरी , नालबंदी , आंबेवडगाव , पथराड , सातगाव डोंगरी , पळासखेडा येथील बंजारा तांड्यातील महिला , पुरुष व तरुण यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मा.दिलीप भाऊ वाघ व मा. संजय नाना वाघ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज , श्री.संत सेवालाल महाराज व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे प्रतिमा पूजन करून तसेच तसेच श्रीफळ वाढवून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. दिलीप भाऊ यांचा जयघोष करण्यात आला.

याप्रसंगी मोरसिंग राठोड , सिताराम पवार , रामेश्वर पवार , शिवदास राठोड , शालिग्राम मालकर , नरसिंग चव्हाण , राहुल राठोड आदिंनी मनोगत व्यक्त करून शासनाच्या वतीने बंजारा बांधवांची फसवणूक व विश्वासघात केल्याचे सांगून वसंतराव नाईक महामंडळ व तांडा सुधार योजनेचे विकासाचे काम रखडलेअसल्याने तांड्यांमध्ये अनेक अडचणी व समस्यांचा सामना करावा लागत असल्याची खंत व्यक्त केली. मा.दिलीप वाघ यांनी आमदार किशोर पाटील यांचेवर टीका करून आमदारांनी विकास कामांचा नव्हे तर आपल्या संपत्तीचा हिशोब सादर करावा. अवैध धंद्यांना पाचोरा व भडगाव तालुक्यात प्रोत्साहन देऊन गुंडाशाही कोणी वाढवली ? याची उत्तरे द्यावीत. महसूल आणि पोलीस विभागाच्या नाकावर टिचून माफियांचा हैदोस व उपद्रव कोणी वाढवला?अशी टीका करून भल्या पहाटे शिकवणी वर्गासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनांमुळे मोठी भीती वाटत असल्याच्या प्रतिक्रिया पालक व्यक्त करीत असून त्या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लेखी पत्र देणार असल्याचे स्पष्ट केले. मी आमदार असताना सध्याच्या आमदारांनी पोलीस ठाण्यासमोर सट्टा पट्टा खेलो आंदोलन केले होते. कदाचित त्याचा त्यांना विसर पडला आहे. आता तर सट्टा पत्ता याचा जणू उत्सव सुरू असून त्याला आमदारांचा आशीर्वाद असल्याची बोचरी टीका केली. बंजारा तांडा वस्तीच्या सर्वांगीण विकास व प्रगतीसाठी साथ देण्याचे आवाहन दिलीप भाऊ वाघ यांनी करताच उपस्थित बंजारा बांधवांनी हात उंचावत व जयघोष करत होकार दर्शवला. मेळाव्यास पाचोरा व भडगाव तालुक्यातील बंजारा महिला , पुरुष व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालिग्राम मालकर यांनी प्रास्ताविक केले. राहुल राठोड यांनी सूत्रसंचालन केले. हर्षल पाटील यांनी आभार मानले.