श्री. गो. से.हायस्कूल येथे स्वागत व सत्कार सोहळा संपन्न

श्री. गो. से.हायस्कूल येथे स्वागत व सत्कार सोहळा संपन्न

 

 

…. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे दि.5 ऑक्टोबर रोजी स्वागत व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

. गो. से हायस्कूल ची माजी विद्यार्थिनी कु.योगिता रविंद्र चौधरी हिने एम.पी.एस. सी. या स्पर्धा परीक्षेत यश मिळवून मंत्रालयीन कनिष्ठ सहाय्यक या पदावर नियुक्ती मिळवल्याबद्दल तिचा शाळेमार्फत शालेय समिती चेअरमन मा.दादासो. श्री.खलील देशमुख व तांत्रिक विभागाचे चेअरमन मा.अण्णासो. श्री. वासुदेव महाजन यांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला.

.. आपल्या प्रास्ताविक भाषणातून माननीय दादासो. श्री. खलील देशमुखी यांनी मातृ व पितृछत्र हरपलेल्या कु. योगिता हिने संघर्षमय परिस्थितीत प्राप्त केलेल्या यशाचा गौरव केला.

….. सत्कारास उत्तर देताना कू.योगिता चौधरी हिने शालेय जीवनात तिला शिक्षकांनी व शाळेने केलेल्या मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

… याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.आर. ठाकरे सर, उपमुख्याध्यापक श्री. आर. एल.पाटील सर,पर्यवेक्षक श्री. ए.बी.अहिरे सर , सौ. ए. आर. गोहील मॅडम, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. एम. टी. कौंडीण्य सर, तांत्रिक विभाग प्रमुख श्री.एस.एन.पाटील सर, माजी पर्यवेक्षक श्री. शांताराम चौधरी सर, कु.योगिता हिचे नातेवाईक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एम.एन.देसले सर व आभार प्रदर्शन श्री.डी.डी.कुमावत सर यांनी केले.