संगीता अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या माधवी सखी मंचाच्या सदस्य महिलांनी श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्वर्गीय कालिंदी बाई पांडे निवासी विद्यालयात चक्की आटा मशीन भेट

संगीता अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या माधवी सखी मंचाच्या सदस्य महिलांनी श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्वर्गीय कालिंदी बाई पांडे निवासी विद्यालयात चक्की आटा मशीन भेट देण्यात आली

 

 

(पाचोरा तालुका प्रतिनिधी अनिल आबा येवले)————————-श्री संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचलित स्वर्गीय कालिंदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयात आज माता माधवी सखी मंच यांच्या विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते महाराज अग्रसेन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दिव्यांग शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी संगीता ताई अग्रवाल नीताताई अग्रवाल मायाताई पटवारी शीलाताई गिंडोडिया विजय अग्रवाल लक्ष्मीकांत पटवारी राजू गिंडोडिया हंसाताई मोर ज्योतीताई सावा गोपाल जी अग्रवाल सामाजिक कार्यकर्ते अनिल आबा येवले(जेष्ठ पत्रकार) तसेच सौ मीनाक्षीताई पांडे श्री प्रदीप जी पांडे आदी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. माता माधवी सखी मंच यांच्याकडून सिंगल फेज तीन एचपी ची आटा चक्की स्वर्गीय कालांदीबाई पांडे मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पुनर्वसन कार्यासाठी स्नेह भेट देण्यात आली याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांच्या दीर्घायु आरोग्यासाठी व उन्नती प्रगतीसाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी गायत्री मंत्रांचे उच्चारण करून पित्या प्रभूस प्रार्थना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन शिक्षकांनी केले कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आला.