के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महिला समिती तर्फे सेल्फ डिफेन्स क्लबचे उद्घाटन

के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महिला समिती तर्फे सेल्फ डिफेन्स क्लबचे उद्घाटन

 

के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महिला समिती तर्फे सेल्फ डिफेन्स क्लबचे उद्घाटन के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात महिला समिती तर्फे विद्यार्थिनींना संरक्षणाचे धडे देण्यासाठी महिला समिती समन्वयक प्रा हर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा ताएकवोंडो असोसिएशनच्या सहयोगाने सेल्फ डिफेन्स क्लब स्थापन करण्यात आला. कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख मान्यवर मणियार विधी महाविद्यालयाचे डॉ विजेता सिंग, के सी ई सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी ,जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन प्रमुख व संचालक प्रा अजित डी घारगे ,महिला विकास कक्ष प्रमुख समन्वयक प्रा हर्षा देशमुख ,अकॅडमिक डीन डॉ प्रज्ञा विखार यांचे हस्ते झाले. छेडछाडीच्या प्रसंगांमुळे अनेकदा महिलांचे मानसिक स्वस्थ्य ढासळते, आत्मविश्वास कमी होतो, त्याचा कुटुंबियांवरही परिणाम होतो. त्यामुळे अशा कठीण प्रसंगांचा सामना केल्यानंतर मनाचा संयम ढळू न देता खंबीरपणे त्यातून मार्ग कसा काढावा, याविषयी डॉ विजेता सिंग यांनी मार्गदर्शन केले . जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तर्फे स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके करून दाखविले .विद्यार्थिनींना संरक्षण देण्याचा नवा उपक्रम या महाविद्यालयातील महिला विकास कक्षाने हाती घेतला .अनुभवी प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यात प्रात्यक्षिकांचा देखील सहभाग असणार आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीपासून ते भयावह अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर, भीतीच्या छायेत वावरणाऱ्या मुलींना संरक्षणाचे धडे महाविद्यालयात देण्यात येणार आहेत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता करोडपती व सेजल चौधरी यांनी केले .कार्यक्रमाला महाविद्यालयातील व्य्वस्थापण विभाग व अभियांत्रिकी ,पॉलिटेकनिकच्या विद्यार्थिनीं उपस्थित होते.