_तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत आंचळगाव विद्यालयाचे घवघवीत यश..!!!!

_तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत आंचळगाव विद्यालयाचे घवघवीत यश..!!!!_

 

भडगाव (वार्ताहर) – जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय तथा भडगाव तालुका क्रीडा समितीतर्फे आयोजित १४ वर्षाआतील शालेय मैदानी स्पर्धेत आंचळगाव ता.भडगाव येथील कै.कृ.पा.माध्यमिक विद्यालय येथील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात विजयी-उपविजयी होत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत, खेळाडूंना क्रीडाशिक्षक महेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

 

यशस्वी खेळाडू-

 

मुले –

 

पंकज देविदास भिल्ल (१०० मी.धावणे तसेच लांबउडीत प्रथम)

 

देवेश दिगंबर महानुभाव (गोळाफेक,प्रथम)

 

मुली –

 

भाग्यश्री बसराज पवार (४०० मी. धावण,प्रथम)

 

दिव्या भिकन मिस्तरी (लांबउडी,प्रथम)

 

प्रतिक्षा धनराज हटकर (गोळाफेक,प्रथम)

 

सुचिता समाधान हटकर (लांबउडी,द्वितीय)

 

रोशनी इंदल राठोड (गोळाफेक,द्वितीय)

 

यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजीव पाटील, मुख्याध्यापक के.ए.पाटील, डी. डी. बोरसे, अभिराज चव्हाण, पी. वाय. पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.