मुसळधार पावसात नारीशक्तीचा एल्गार वैशालीताईंना भेटण्यासाठी शेकडो महिलांचा जमाव

मुसळधार पावसात नारीशक्तीचा एल्गार वैशालीताईंना भेटण्यासाठी शेकडो महिलांचा जमाव

 

*पाचोरा, दिनांक २८ (प्रतिनिधी )* : मुसळधार पाऊस कोसळत असतांना शेकडो महिला कुणासाठी गावात वाट पाहतील यावर आपला विश्वास बसणार नाही. मात्र हेच चित्र तालुक्यातील वरखेडी येथे शेतकरी शिवसंवाद यात्रेत दिसून आले. येथील नारीशक्तीने एकमुखाने वैशालीताई सुर्यवंशी यांच्या पाठीशी उभी राहण्याची ग्वाही दिली.

 

सध्या जोरदार पाऊस कोसळत असून देखील वैशालीताई सुर्यवंशी या शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून गावोगावी संवाद साधत आहेत. अनेकदा भर पावसातच त्यांची यात्रा सुरू असल्याचे आधीच दिसून आले आहे. यात वरखेडी खुर्द गावात अभूतपुर्व दृश्य दिसून आले. शुक्रवारी दुपारी वैशालीताई या आपल्या सहकाऱ्यांसह या गावात गेल्या असतांना मुसळधार पाऊस सुरू झाला. तथापि, पाऊसपाण्याची पर्वा न बाळगता गावातील शेकडो महिला त्यांच्या स्वागताला उपस्थित होत्या.

 

वैशालीताई यांचे स्वागत केल्यावर उपस्थित माता-भगिनींनी त्यांना विविध समस्यांसाठी साकडे घातले. यात प्रामुख्याने गावात सार्वजनीक शौचालय नसल्यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होत असल्याची व्यथा कथन करण्यात आली. तसेच रस्त्यांची समस्या गंभीर असल्याचे देखील सांगण्यात आले. यावर ताईंनी या समस्यांचे नक्कीच निराकरण करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यानंतर पाऊस सुरू असतांनाच वैशालीताईंनी गावातील घरोघरी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यानंतर लासुरे गावात देखील शेतकरी शिवसंवाद यात्रेचे स्वागत झाल्यावर त्यांनी गावकऱ्यांशी वार्तालाप केला.

 

शेतकरी शिवसंवाद यात्रेत उध्दव मराठे, अरूण पाटील, अभय पाटील, विसपुते अण्णा, गजू पाटील, अभिषेक सोनार, धनराज पाटील, अरूण तांबे, तिलोत्तमा मौर्य, योजना पाटील, कुंदन पांड्या, ज्ञानेश्वर चौधरी, आनंदा चौधरी, जगदीश पाटील, शाम वाघ, जिभू सपकाळे, पितांबर सपकाळे, अनिल पाटील, अण्णा चव्हाण, विश्वास मराठे, विनोद मराठे, शेखर आप्पा, शिवदास मराठे, अण्णा पाटील, प्रवीण पाटील, समाधान चव्हाण, दीपक चव्हाण, अनिता पाटील, जयश्री येवले, प्रतिभा ईश्वर पाटील, बेबा पाटील, प्रतिभा रवींद्र पाटील यांच्यासह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी यांच्यासह अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.