ताई, त्यांनी फक्त थापा मारल्या, कामाच्या नावाने सगळीच बोंब !शेतकरी शिवसंवाद यात्रेत ग्रामस्थांच्या संतापाचा स्फोट

ताई, त्यांनी फक्त थापा मारल्या, कामाच्या नावाने सगळीच बोंब !शेतकरी शिवसंवाद यात्रेत ग्रामस्थांच्या संतापाचा स्फोट

 

पाचोरा, दिनांक 27 (प्रतिनिधी ) : ”लोकप्रतिनिधीने फक्त आश्वासने व भूलथापांच्या शिवाय काहीही दिले नसून कामेच केली नसल्याने आम्हाला खूप अडचणी येत आहेत !” अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी शिवसंवाद यात्रेत ग्रामस्थांनी व्यक्त करत आपल्या व्यथा वैशालीताई सुर्यवंशी यांना ऐकवल्या.

 

आज सकाळी जोगेतांडा, कोकडी तांडा, आंबेवडगाव तांडा क्रमांक एक आणि दोन तसेच आंबेवडगाव या गावांमध्ये शिवसंवाद यात्रा काढण्यात आली. या यात्रेत जोगेतांडा येथील नवलसिंग चव्हाण, कांतीलाल चव्हाण, अर्जुन पवार, नामदेव चव्हाण, सखाराम पवार, रामसिंग पवार, संजय जाधव आदींची उपस्थिती होती. येथील नागरिकांनी गावात सार्वजनीक शौचालयांचा अभाव असल्याने ग्रामस्थांची आणि त्यात देखील महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत असल्याची समस्या सांगितली. तसेच गावाला जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा झाल्यामुळे मोठ्या अडचणी येत असल्याच्या व्यथा सांगितल्या. यावर वैशालीताईंनी आपण निवडून आल्यावर या सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी उपस्थितांनी विद्यमान लोकप्रतिनिधीने विकासाच्या फक्त थापा मारून काहीही काम केले नसल्याचा आरोप केला.

 

यानंतर, कोकडीतांडा येथील सुरेश चव्हाण, दिनेश राठोड, नितेश चव्हाण, ग्यानदास चव्हाण, गोलू चव्हाण, योगेश कदम यांच्यासह ग्रामस्थ यात्रेत सहभागी झाली. या गावातील लोकांनी देखील रस्त्याच्या समस्येमुळे आम्ही सर्व जण त्रस्त झाले असल्याचे सांगितले. आंबेवडगाव तांडा क्रमांक एक येथील सचिन पवार, भुरासिंग चव्हाण, प्यारेलाल पवार, सुनील चव्हाण, नरेंद्र पवार, आदेश पवार, यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले. याप्रसंगी या तांड्यातील योगेश पवार, रामेश्वर पवार, सुनील पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश घेतला. वैशालीताई सुर्यवंशी यांनी या सर्वांचे स्वागत केले.

 

दरम्यान, आंबेवडगाव तांडा क्रमांक दोन येथील प्रवीण शेरावत, राजूभाऊ राठोड, चरण राठोड, साईदास राठोड, गोकुळ चव्हाण, अण्णा जाधव, विकास जाधव, समाधान राठोड आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले. तर आंबेवडगाव येथील अनिल पाटील, पितांबर सपकाळे, संतोष पाटील, निखील भुसारे, तंगेश गायकवाड, संजू डिगे, वाल्मीक देवरे, शरद देवरे, विकास चव्हाण, हिंमत न्हावी, सुनील न्हावी, अशोक गायकवाड, बालू डॉक्टर, सुनील निकम, मंगेश खैरनार, मोहन चव्हाण आणि राजू वाघ यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. येथील नागरिकांनी देखील रस्त्यासह विविध समस्यांबाबत वैशालीताई सुर्यवंशी यांच्याकडे व्यथा मांडली.

 

याप्रसंगी उध्दव मराठे, अरूण पाटील, अभय पाटील, विसपुते अण्णा, गजू पाटील, अभिषेक सोनार, धनराज पाटील, अरूण तांबे, तिलोत्तमा मौर्य, योजना पाटील, कुंदन पांड्या, ज्ञानेश्वर चौधरी, आनंदा चौधरी, जगदीश पाटील, शाम वाघ, जिभू सपकाळे, पितांबर सपकाळे, अनिल पाटील, अण्णा चव्हाण, विश्वास मराठे, विनोद मराठे, शेखर आप्पा, शिवदास मराठे, अण्णा पाटील, प्रवीण पाटील, समाधान चव्हाण, दीपक चव्हाण, अनिता पाटील, जयश्री येवले, प्रतिभा ईश्वर पाटील, बेबा पाटील, प्रतिभा रवींद्र पाटील यांच्यासह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी यांच्यासह अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.