धनगर समाज आरक्षणासाठी गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेतलेल्या सोरमारे आणि कोळसे यांना मच्छीमारांनी वाचविले, आरक्षण न दिल्यास स्वतः चे गळे कापून घेण्याचा सोरमारे यांचा इशारा?

धनगर समाज आरक्षणासाठी गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेतलेल्या सोरमारे आणि कोळसे यांना मच्छीमारांनी वाचविले, आरक्षण न दिल्यास स्वतः चे गळे कापून घेण्याचा सोरमारे यांचा इशारा?

 

(सुनिल नजन/चिफब्युरो/अहमदनगर जिल्हा) महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला एसटी आरक्षण द्यावे म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासाफाटा येथे आठरा सप्टेंबर पासून धनगर समाजातील सहा जणांचे उपोषण सुरू होते.सरकारने या आंदोलकांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून 26 सप्टेंबर रोजी गुरुवारी सकाळी उपोशनार्थीं प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळसे यांनी प्रवरा संगम येथील पुलावरुन गोदावरीच्या नदीपात्रात उड्या टाकून जलसमाधी घेतली होती. परंतु नदीपात्रात मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांनी या दोघांना वाचविले आणि मासे पकडण्यासाठी च्या होडीतून नदीच्या काठावर आणले.मग मच्छीमार बांधवांनी 112 ,108 या नंबर वर फोन करून अँम्ब्युलंसला बोलावून घेतले. त्यांच्या समवेत पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी हजर झाला होता. नंतर या दोघांना नेवासाफाटा येथील सरकारी दवाखान्यात आणले असतानाही त्यांनी औषधोपचार घेण्यास नकार दिला. प्रथम मिडिया समोर आपली व्यथा मांडली. सोरमारे म्हणाले की या प्रशासनाला व महाराष्ट्राला कंटाळून आम्ही नदी पात्रात उड्या टाकल्या. होडीवाल्यांनी आम्हाला वाचविले. महाराष्ट्रातील सर्व पोलिस आले व आम्हाला मेले का नाही असे म्हणाले असा आरोप सोरमारे यांनी मिडिया समोर केला.आम्ही धनगर समाजाला आरक्षण मिळाल्या शिवाय मरणार नाहीत,पण जर सरकारने लवकर धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास आम्ही आमचे स्वतः चे गळे प्रशासना समोर कापून घेउ असा निर्वानिचा इशारा प्रल्हाद सोरमारे यांनी शेवटी दिला. गोदावरीच्या नदी पात्रात दोघांनी जलसमाधी घेतल्याची बातमी वाऱ्या सारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरताच तमाम धनगर समाजात सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण झाला होता. सोरमारे आणि कोळसे जिवंत सापडल्याने धनगर समाजाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. उपोशनार्थींनी आत्महत्येचा मार्ग न अवलंबीता संविधानाच्याच मार्गाने गेले पाहिजे असे तमाम धनगर समाजाचे म्हणणे आहे.उपोशनार्थीं राजूमामा तागड,रामराव कोल्हे,देविलाल मंडलिक, भगवान भोजने यांचीही तब्येत खालावली आहे. सरकारने त्वरित एसटी प्रमाणपत्राची अंमलबजावणी करावी अशी सर्वांची मागणी आहे. धनगर समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न करता कायदेशीर मार्गाने आपला लढा सुरु ठेवावा असे आवाहन भाजपचे माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते प्रकाशआण्णा शेंडगे आणि शेवगाव तालुक्यातील धनगर समाजाचे नेते जगन्नाथ पाटील गावडे यांनी केले आहे.वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी मात्र आपली सहकार्य करण्याची भुमिका कायम ठेवली आहे.