माहेरासह परिसरात वैशालीताई सुर्यवंशींचे अभूतपुर्व स्वागत

माहेरासह परिसरात वैशालीताई सुर्यवंशींचे अभूतपुर्व स्वागत

महिलांचा शिवसेना-उबाठात प्रवेश; सर्वत्र परिवर्तनाचा जागर

 

*पाचोरा, दिनांक १५ (प्रतिनिधी )* : शेतकरी शिवसंवाद यात्रेला आज दोन्ही सत्रांमध्ये अतिशय उदंड असा प्रतिसाद लाभला. तर प्रामुख्याने स्व. तात्यासाहेबांची कर्मभूमी व वैशालीताई सुर्यवंशी यांचे माहेर असणाऱ्या अंतुर्ली बुद्रुकमध्ये तर त्यांचे अभूतपुर्व स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांनी आपल्या लेकीच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.

 

आज सकाळीच बांबरूड खुर्द येथील श्री राम मंदिरात वंदन करून शेतकरी शिवसंवाद यात्रा सुरू झाली. येथे वैशालीताई सुर्यवंशी यांनी उपस्थितांशी संवाद साधतांना आपण सर्वांगीण विकास करण्यासाठी तुमच्या सोबत वार्तालाप करण्यासाठी आलो आहोत. आपल्याला येणाऱ्या सर्व अडचणींचे निराकरण करण्यासाठी आम्ही कटीबध्द असल्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. माझे वडील तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांनी ज्या प्रकारे मतदारसंघाचा विकास केला होता, अगदी त्याच प्रकारे समग्र विकास करण्यासाठीच मी जनतेचा कौल मागत असल्याचे त्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले.

 

याप्रसंगी बांबरूड येथील सुखलाल हिम्मत पाटील, संभाजी रामदास पाटील, सदाशिव हिम्मत पाटील, सुरेश सिताराम पाटील, नेताजी गिरगाव पाटील, संजय पुंडलिक पाटील, अंबरसिंग राजपूत, धीरज भालेराव, राजेंद्र जगदीश बागुल, शिवाजी शिंदे, एकनाथ पाटील, भरत शिणकर, नागराज बाबुराव पाटील, नारायण राजपूत, सदाशिव राजपूत रवींद्र अर्जुन पाटील संजय पाटील दत्तू साहेबराव पाटील, राहुल पाटील, भाऊसाहेब पाटील, सुरेश तुळशीराम ठाकरे, प्रवीण गुरव, सुभाषचंद्र पाटील यांची उपस्थिती होती.

 

यानंतर लोहटार गावात पुष्पवर्षावात वैशालीताई सुर्यवंशी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. येथे महिलांनी अतिशय उत्स्फुर्तपणे यात्रेचे स्वागत केले. तर ताईंनी आबालवृध्दांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी लोहटार येथील गोपाल परदे