के सी ई सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियंता दीना निमित्त टेक हर्ट्झ २४ चे आयोजन

के सी ई सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियंता दीना निमित्त टेक हर्ट्झ २४ चे आयोजन

 

 

 

के सी ई सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियंता दीना निमित्त टेक हर्ट्झ २४ चे आयोजन : : के सी ई सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात अभियंता दीना निमित्त टेक हर्ट्झ २४ चे इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर विभागा तर्फे आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतातील पहिले अभियंता भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे असिस्टंट इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर इंडस्ट्री एनर्जी लेबर अँड माईन डिपार्टमेंट महाराष्ट्र शासन इंजिनिअर हेमंत शर्मा यांचे हस्ते करण्यात आलेत, मंचावर प्राचार्य डॉ संजय सुगंधी अकॅडमिक डीन डॉ प्रज्ञा विखार उपस्थित होते आजचा दिवस संपूर्ण देशात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. कारण भारतातील पहिले अभियंता भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा हा जन्मदिवस. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे केवळ अभियंता नव्हते, तर ते थोर देशभक्तही होते. आजच्या दिवशी म्हणजे १५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मदनहल्ली या छोट्याश्या गावात त्यांचा जन्म झाला . विश्वेश्वरय्या (M Visvesvaraya) यांची जयंती आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी १५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतात ‘अभियंता दिन’ म्हणजेच ‘इंजिनिअर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. एम विश्वेश्वरय्या यांचे पूर्ण नाव मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. भारताव्यतिरिक्त, श्रीलंका आणि टांझानियामध्येही १५ सप्टेंबर हा दिवस Engineers’ Day म्हणून साजरा केला जातो.देशातील इंजिनिअर्सनी (अभियंत्यांनी) केलेल्या प्रयत्नांची पावती देण्यासाठी ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ (National Engineers Day) साजरा केला जातो. अभियंत्यांना कठीण अभ्यासापासून कामापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कोणत्याही देशाचा पायाभूत सुविधांचा विकास अभियंत्यांशिवाय अशक्य आहे. कारण अभियंत्यांच्या अथक परिश्रमामुळे आपण नवीन तंत्रज्ञान वापरू शकतो.त्यांच्या कार्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी दिली ,अभियंता दीना निमित्त महाविद्यालयात पोस्टर स्प्लॅश ,टेक स्क्राइब ,लोगो लॉफ्ट ,वेस्ट वोव अश्या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेत इंजिनीरिंग व पॉलीटेकनिक चे मोठया प्रमाणात प्रवेशिका प्राप्त होत्या पोस्टर स्प्लॅश मध्ये परीक्षक म्हणून प्रा अविनाश सूर्यवंशी ,प्रा. शेफाली अग्रवाल ,डॉ विणा भोसले ,प्रा अश्विनी देवराळे ,प्रा.शीतल बोरोले ,तर विजेते स्पर्धक पल्लवी पाटील ,इशा पाटील ,गार्गी व यज्ञा कापडे ,मृणालिनी कासार ,श्रेया वाराणकर ,वैष्णवी महाजन ,देवाशिष मुंदडा ,स्नेहल चौधरी व रोशनी चिंचोले होते .वेस्ट टु वोव स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून प्रा के बी पाटील व प्रा दर्शन ठाकूर तर विजेते स्पर्धक मोहनीश जगताप व गायत्री महाले होते ,क्विझ स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून प्रा निकिता चौधरी व रुपाली साळुंके तर विजेते तेजस दलवाले ,रुद्र कोल्हे ,राज मुरकुटे ,दीक्षा बोरसे ,अनिकेत नाथ ,होते,लोगो डिझाइन करीत परीक्षक म्हणून ऑफलाईन स्पर्धेकरिता जगदीश पाटील तर विजेते रिया शिंपी ,कोमल पाटील होते .ऑनलाईन लोगो डिझाईन स्पर्धेकरिता परेश म्हणून प्रा हर्षा देशमुख ,प्रा कल्पेश महाजन ,प्रा.सचिन नाथ तर विजेते स्पर्धक यज्ञेश बारी व यशराज पाटील कोडिंग स्पर्धेकरीता परीक्षक म्हणून प्रा स्नेहल पवार ,राजश्री शेकोकारे ,माधुरी रायसिंगे तर विजेते स्पर्धक राधिका पाटील व निकिता पाटील होते .टेक्निकल ऐसे करिता परीक्षक म्हणून प्रा प्रसाद कुलकर्णी व प्रा लीना वाघुळदे तर विजेते वैष्णवी महाजन ,श्रद्धा बारी सनी कोळी होते स्पर्धेतील सहभागी प्रथम ,द्वितीय ,तृतीय विजेते विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले . इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर विभागाचे प्रा स्नेहा पाटील ,प्रा राहुलकुमार पटेल ,प्रा. सचिन भंगाळे ,डॉ सी एस पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आणि सूत्रसंचालन सुजल हिंगोणेकर व अमित कसबे व आभार प्रदर्शन वैष्णवी पाटील यांनी केले कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी ,अकॅडमिक डीन डॉ प्रज्ञा विखार ,व सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते