बांबरूडमध्ये वैशालीताईंचा ग्रामस्थांशी वार्तालाप

बांबरूडमध्ये वैशालीताईंचा ग्रामस्थांशी वार्तालाप !

 

पाचोरा, दिनांक १५ (प्रतिनिधी ) : आज वैशालीताई सुर्यवंशी यांनी तालुक्यातील बांबरुड खुर्द (महादेवाचे) गावातील श्रीराम मंदिरात श्रीराम आणि माता सीतेचे दर्शन घेऊन शेतकरी संवाद यात्रेला सुरुवात केली. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी गावातील महिलांनी ताईंचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी श्रीराम मंदिराच्या ओट्यावर कार्यकर्त्यांसह गावातील मंडळींसोबत संवाद साधला.

 

यावेळी वैशालीताई सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यमान आमदारांसह इतरांनी आतापर्यंत केलेल्या कामाबाबत ग्रामस्थांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि तात्यासाहेब आर.ओ. पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासह पाचोरा व भडगाव तालुक्याचा विकास व्हावा. या सिटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणार असून मला आपल्याकडून चांगली साथ मिळावी असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले.

 

आजच्या यात्रेत शिवसेना शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव मराठे, ॲड. अभय पाटील, गजू पाटील, राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल, प्रमोद नाना पाटील, संदीप जैन, नामदेव चौधरी, तिलोतामा मौर्य, कुंदन पाड्या, अरुण तांबे, अनिता पाटील, लक्ष्मी पाटील, जयश्री येवले, उषा परदेशी, बेबाबाई पाटील, नीता भंडारकर, मनीषा पाटील, अरुण तांबे, आवेश खाटीक, नाना भिमसिंग पाटील, विजय आनंदा पाटील, पी. एन. पाटील, अण्णा कोळी, विश्वास पाटील, संभाजी पाटील, भरत पाटील, प्रणित पाटील, शरद पाटील, सदाभाऊ चौधरी, अनिल सावंत, मनोज चौधरी, शशी पाटील, शशिकांत बोरसे, योजनाताई पाटील, जयश्री येवले, लक्ष्मी पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

या यात्रेत गावातील सुखलाल हिम्मत पाटील, संभाजी रामदास पाटील, सदाशिव हिम्मत पाटील, सुरेश सिताराम पाटील, नेताजी गिरगाव पाटील, संजय पुंडलिक पाटील, अंबरसिंग राजपूत, धीरज भालेराव, राजेंद्र जगदीश बागुल, शिवाजी शिंदे, एकनाथ पाटील, भरत शिणकर, नागराज बाबुराव पाटील, नारायण राजपूत, सदाशिव राजपूत रवींद्र अर्जुन पाटील संजय पाटील दत्तू साहेबराव पाटील, राहुल पाटील, भाऊसाहेब पाटील, सुरेश तुळशीराम ठाकरे, प्रवीण गुरव, सुभाषचंद्र पाटील यांचे सह गावातील युवा कार्यकर्ते, महिला पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.