तिसगावातील कै.मच्छिंद्र ससाणे यांच्यावर चोरीच्या उद्देशाने हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांच्या गणपती विसर्जनाच्या आत मुसक्या आवळूः पोलीस निरिक्षक संतोष मुटकुळे

तिसगावातील कै.मच्छिंद्र ससाणे यांच्यावर चोरीच्या उद्देशाने हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांच्या गणपती विसर्जनाच्या आत मुसक्या आवळूः पोलीस निरिक्षक संतोष मुटकुळे

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”/स्पेशल क्राईम रिपोर्टर/अहमदनगर जिल्हा) “बताव क्या है,सोना किधर है”असे म्हणत पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील कै.मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचा सहा सप्टेंबर रोजी चोरट्यांच्या हल्ल्यात म्रुत्यु झाला होता. आरोपींचा लवकर तपास करून त्यांना अटक करावी म्हणून तिसगावातील ग्रामस्थांनी तिसगावातील सर्व दुकाने बंद ठेवून गावातून मोर्चा काढला होता. बाजार तळावरील महादेव मंदिरासमोर झालेल्या जाहीर निषेध सभेत गावातील सर्व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. गावातील तिनचार ठिकाणी झालेल्या चोऱ्या,आणि शालेय विद्यार्थ्यीनींची होणारी छेडछाड या विषयी ग्रामस्थांनी आपल्या संताप जनक भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या.पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. या टीकेला उत्तर देताना पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी कै.मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांच्या वर चोरीच्या उद्देशाने केलेल्या हल्ल्यातील हल्लेखोरांच्या गणपती विसर्जनाच्या आत मुसक्या आवळून गजाआड करण्याचे आश्वासन दिले.तसेच या तपासासाठी पाथर्डीचे दोन पोलीस पथके,आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची दोन पथके तयार केले आहेत. ते आरोपीच्या मागावर आहेत. सीसीटीव्हीतील फुटेज वरून संशयित आरोपी निश्चितच पकडले जाणार आहेत असे सांगितले. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी सरपंच जेष्ठ नेते काशिनाथ पाटील लवांडे,प्रकाशबुवा रामदासी, शेख बाबा पुढारी, नंदकुमार लोखंडे,इलियास शेखसर,भाउसाहेब लोखंडे,पुरुषोत्तम आठरे,मनोज ससाणे, अरविंद सोनटक्के, भाउसाहेब ससाणे,संजय पाटील लवांडे, अविनाश नरवडे,रफिक शेख,मारुती लवांडे, सुनिल शिंगवी, यांच्या सह गावातील ग्रामस्थासह अनेक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बाबत पाथर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा रजिस्टर नंबर 844/2024, भारतीय न्याय संहिता (2023चे)सुधारित कलम 103(1),309(6),331(8),127,(2) प्रमाणे मयताचा मुलगा बाळासाहेब मच्छिंद्र ससाणे रा.तिसगाव ता.पाथर्डी यांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यात त्यांनी असे म्हटले आहे की सहा सप्टेंबर च्या रात्री 12.45 च्या दरम्यान तिन चार चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने मयताच्या डोक्यावर तीक्ष हत्याराने वार केला. घरातील माणसे घरात झोपी गेलेली असताना घराला बाहेरून कड्या लावलेल्या होत्या.शेळ्या च्या गोठ्यात काही लोक चोरी करण्याचा प्रयत्न करीत होते.म्हणून मयत मच्छिंद्र ससाणे हे झोपेतून जागे होउन त्यांनी घराचा दरवाजा उघडला असता त्यापैकी एका इसमाने त्यांना दरवाजातून जोरदार धक्का देऊन खाली पाडले. आणि घरात घुसून मारहाण केली. आणि मयताच्या पत्नीस “बताव क्या है,सोना किधर है”असा दम देत असताना यातील एकाने मयताच्या डोक्यावर वार करून त्यांना जीवे ठार मारले. तसेच कोंबड्या च्या खुराड्यातील दोन हजार रुपये किंमतीच्या 4 गावरान कोंबड्या चोरून नेल्या या प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.तिसगाव ग्रामस्थांनी तिसगावातील पोलिस चौकीत कायमस्वरूपी दोन पोलीस नेमण्यात यावे अशी मागणी केली . मयत ससाणे प्रकरणाचा तपास दहा दिवसांत लागला तर ठीक नाही तर दहा दिवसांनी पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा ईशारा यावेळी देण्यात आला आहे.पाथर्डीच्या पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले की या प्रकरणाचा त्वरित तपास लावल्यास याच मंदिरा समोर पाथर्डीच्या पोलीसांचा सन्मान सोहळा साजरा करू.जेष्ठनेते काशिनाथ पाटील लवांडे यांनी जाहीर सभेत तिसगावातील दोन नंबर धंदे कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहेत ते ताबडतोब बंद करण्याची पोलिसांकडे मागणी केली आहे.