के सी इ सोसायटीचे इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात हॉकीचे जादूगार मेजरध्यानचंद यांची जयंती साजरी :
भारतीय हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांची आज जयंती. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय हॉकी संघाचा दबदबा तयार करण्यात ध्यानचंद यांचा मोठा वाटा होता. १९२८, १९३२ आणि १९३६ अशा लागोपाठ ३ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात ध्यानचंद यांनी मोलाची भूमिका बजावली होती. याच कारणासाठी २९ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. वर्षभर विविध खेळांमध्ये चांगली कामगिरी करणारे खेळाडू, प्रशिक्षक यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष पुरस्कारांनी गौरव करण्यात येतो.राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांनी विद्यार्थ्यांना किमान एक तास मैदानी खेळांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी ,क्रिडा प्रमुख प्रा. नितीन चौधरी , तसेच डॉ सी एस पाटील ,प्रा. के बी पाटील ,प्रा. अविनाश सूर्यवंशी , प्रा महेंद्र पवार,प्रा. रवींद्र स्वामी, प्रा हर्षा देशमुख ,प्रा शेफाली अग्रवाल ,व विभाग प्रमुख इतर प्राध्यापक वृंद ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे यशस्विते करिता प्रा. विजय चौधरी यांनी मेहनत घेतली.