पाचोऱ्यात गोविंदाची मृत्यूशी झुंज देत अखेर ज्योत मावळी

पाचोऱ्यात गोविंदाची मृत्यूशी झुंज देत अखेर ज्योत मालवली

कॉग्रेस ची आर्थिक मदतीची मागणी

 

पाचोरा (प्रतिनिधी) – शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील दहीहंडीत ३५ वर्षीय गोविंदा पडल्याने जखमी झाला. मृत्यूशी झुंज देत अखेर ज्योत मालवली शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत गोविंदा च्या परीवाराला आर्थिक मदतीची कॉग्रेस ने मागणी केली आहे

 

 

 

शहरातील रिक्षा स्टॉप सह स्टेशन रोड परीसरातील युवकांनी दहीहंडी चे नियोजन केले होते. यावेळी गोविंदा पथकातील नितीन पांडुरंग चौधरी हा ३२ वर्षीय युवक दहीहंडी फोडतांना खाली पडला त्यास हॉस्पिटल मध्ये औषध उपचार सुरू असतांनाच आज दि. २८ रोजी मृत्यूशी झुंज देत अखेर ज्योत मालवली. स्व. नितीन च्या जाण्याने शहरात शोककळा पसरली घटनेचे वृत्त मिळताच कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात भेट दिली यावेळी मयत गोविंदा नितीन चौधरी यांच्या परीवाराला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी शवविच्छेदन केले.

 

शहरात या घटनेचे वृत्त समजताच शोककळा पसरली शोकाकुल वातावरणात नितीन चौधरी चे अंत्यसंस्कार करण्यात आले.. नितीन हा रिक्षा चालक होता घरातील कर्ता पुरुष होता.हसतमुख असणारा आणि नेहमी सामाजिक कार्यात सहभागी होणारा म्हणून त्याची ओळख होती. त्याच्या पच्छात आई वडील दोन भाउ आहेत.