पी.टी सी.शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे fine art cet त घवघवीत यश

पी.टी सी.शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे fine art cet त घवघवीत यश

 

कलेच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र शासनाची MH-AAC-CET प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत हजारो विद्यार्थी प्रविष्ट होतात. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेज ला प्रवेश मिळत असतो. कलेचे माहेरघर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई व गव्ह.कॉलेज ऑफ आर्ट छ.संभाजी नगर येथे प्रवेश मिळवणे खूप जिकरीचे असते. तयाठिकाणी अप्लाइड आर्ट या विभागासाठी प्रवेश मिळावा म्हणून प्रत्येक विद्यार्थी प्रचंड मेहनत घेत असतात. पाचोरा येथील एम एम कॉलेजचे मा.विद्यार्थी यांनी हे यश संपादन केले

स्वामिनी संजय जडे हिला कलेचे माहेरघर सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मुंबई येथे प्रवेश मिळाला आहे. पाचोरा सुवर्णकार समाजातील यादव परिवारातील जे जे, मुंबई येथे जाणारी ही पहिली विद्यार्थिनी आहे. कु. दिक्षा राजेंद्र चांदणे व निशांत समाधान पाटील बांबरुड खुर्द यांना गव्हर्नमेंट स्कूल ऑफ आर्ट छत्रपती संभाजी नगर येथे अप्लाइड आर्ट या विभागासाठी प्रवेश मिळाला आहे.

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय जी वाघ ,

तनिष्का गटाच्या अध्यक्षा सौ. ज्योतीताई वाघ यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी

प्रा.श्री भागवत महालपुरे,हारून दादा देशमुख ,श्री संजय पाटील सर श्री संजय जडे ,श्री संजय करंदे सर श्री रणजीत पाटील सर

श्री ‌‌सुबोध कांतायन सर याची उपस्थिती होती.

नानासाहेबांनी त्यांना भविष्यात कलेच्या क्षेत्रात प्रगती करून नामवंत कलाकार होऊन आपल्या पाचोर्‍याचे, संस्थेचे आणि कुटुंबाचे नावलौकिक करावेवअश्या शुभेच्छा दिल्यात.या विद्यार्थ्यांना सुबोध कांतायन सर यांचे मार्गदर्शन लाभले .