चोपडा महाविद्यालयात खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती उत्साहात साजरी

चोपडा महाविद्यालयात खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती उत्साहात साजरी

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य व मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.के.एन.सोनवणे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के. एन.सोनवणे यांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी क्रीडा संचालिका डॉ. सौ.के.एस. क्षीरसागर, डॉ.एम.एल.भुसारे, वाय.एन. पाटील, जी. बी. बडगुजर, सौ.एस.ए.सोनवणे, एन. पी. सोनवणे आदि उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे म्हणाले की, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातून मानवी जीवनाचे वास्तव सत्य प्रकट झाले आहे. मानवी मनाचे मनोविश्लेषण त्यांनी अत्यंत साध्या-सोप्या भाषेत केले असून त्यांच्या काव्य लेखनाने मराठी साहित्य क्षेत्रात अनमोल भर टाकली आहे. यावेळी त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ‘मन’ या कवितेतील मतितार्थ स्पष्ट करून सांगितला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जी.बी. बडगुजर यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.