राखीच्या बंधनाने आनंदली मतिमंद बांधवांची शाळा पाचोर्‍यात रोटरी क्लबच्या भावनिक उपक्रमाचे कौतुक 

राखीच्या बंधनाने आनंदली मतिमंद बांधवांची शाळा पाचोर्‍यात रोटरी क्लबच्या भावनिक उपक्रमाचे कौतुक

 

पाचोरा- येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव तर्फे माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय यांच्या सहयोगाने आज तारीख 23 रोजी मतिमंद बांधवांचे रक्षाबंधन उत्साहात संपन्न झाले. औक्षण करत मनगटावर राखी बांधल्यानंतर मतिमंद बांधवांचे उजळलेले चेहरे बघून बहिणी सुद्धा अत्यंत पूलकीत झाल्या. हा आनंद सोहळा मतिमंद विद्यालय व उपस्थित विद्यार्थिनी यांच्यासाठी चिरंतन चैतन्य देवून गेला.

 

रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे हा रक्षाबंधन उपक्रम आयोजित करण्यात आला होता. येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयातील 5 वी ते 7 वी आणि 11 वी व 12 वी या सकाळ सत्रातील विद्यार्थिनींनी आज तारीख 23 रोजी सकाळी 10 वाजता सौ. कालिंदीबाई पांडे मतिमंद विद्यालयात जाऊन मतिमंद बांधवांना समारंभ पूर्वक राख्या बांधल्या. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. डॉ. पवनसिंग पाटील, सेक्रेटरी प्रा. शिवाजी शिंदे, मतिमंद विद्यालय चे अध्यक्ष प्रदीप पांडे सर, संचालक निलेश पांडे, रो. चंद्रकांत लोढाया, रो. भरत सिनकर, रो. डॉ. अमोल जाधव, रो. डॉ. मुकेश तेली, रो.डॉ. आहे गोरख महाजन, रो. डॉ. वैभव सूर्यवंशी, रो. डॉ. बाळकृष्ण पाटील, रो. डॉ. तौसीफ खाटीक, कन्या विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार, रो. शरद मराठे यांचे सह कन्या विद्यालयाच्या शिक्षिका प्रा. अंकिता देशमुख, प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. संगीता राजपूत, व सुरेखा बडे तसेच शिक्षक नंदू पाटील उपस्थित होते. मतिमंद विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच प्रार्थना व गायत्री मंत्र म्हणून दाखवला.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिठाबाई कन्या विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कालिंदीबाई पांडे मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय राजगुरे, ए. के. महाले, जगदीश पाटील , गौरव चव्हाण, राजेंद्र महाजन आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. युवा उद्योजक रोटरी सदस्य शरद मराठे यांनी मतिमंद विद्यार्थ्यांना फळे वाटप केली. शारदा इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य डी. ए. पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार प्रकटन केले.