एम.एम.महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. युगंधरा राजेंद्रसिंग पाटील परीक्षेत ‘पुरवठा निरीक्षक’ या पदावर निवड

एम.एम.महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. युगंधरा राजेंद्रसिंग पाटील परीक्षेत ‘पुरवठा निरीक्षक’ या पदावर निवड

 

 

एम.एम.महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. युगंधरा राजेंद्रसिंग पाटील हिची फेब्रुवारी 2024 मध्ये आय.बी.पी.एस. तर्फे सरळ सेवेद्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत ‘ पुरवठा निरीक्षक ‘ या पदावर निवड झाली असून तिला नांदुरा , जि.बुलढाणा येथे नियुक्ती मिळाली आहे. कु. युगंधरा चा शैक्षणिक आलेख सतत उंचावत आलेला आहे. पदवी परीक्षेत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ‘ इंग्रजी ‘ विषयात ती ‘ सुवर्णपदकाची ‘ मानकरी ठरलेली आहे. यापूर्वी तिची विद्यापीठातर्फे ‘ बोर्ड ऑफ स्टडीज ‘ या इंग्रजी विषयाच्या अभ्यास मंडळावर कुलगुरूद्वारे नेमणूक झालेली आहे. तसेच एम.पी.एस.सी.(MPSC) द्वारे घेण्यात आलेल्या 2022 व 2023 या वर्षीच्या ‘ पोलीस उपनिरीक्षक ‘ पदासाठीच्या मुख्य परीक्षा तिने सलग दोन वेळा उत्तीर्ण केलेल्या आहेत. तिच्या या यशाबद्दल भाऊसो दिलीप ओंकार वाघ( अध्यक्ष पी.टी.सी. पाचोरा), चेअरमन नानासो संजय ओंकार वाघ , व्हाईस चेअरमन नानासो व्ही.टी. जोशी , संस्थेचे मानद सचिव दादासो महेश एस. देशमुख , महाविद्यालयाचे प्राचार्य , उपप्राचार्य तसेच सर्व प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले आहे. ती राजेंद्रसिंग धनसिंग पाटील यांची कन्या असून आरोग्य विभागात कार्यरत श्री नरेंद्र पाटील यांची पुतणी आहे. तिला प्रा. राजेंद्र चिंचोले यांचे मार्गदर्शन लाभले.