चोपडा महाविद्यालयात “जागो ग्राहक जागो” मोहिमेअंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे अयोजन

चोपडा महाविद्यालयात “जागो ग्राहक जागो” मोहिमेअंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे अयोजन

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने *जागो ग्राहक जागो* मोहिमेअंतर्गत महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस. ए. वाघ, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सी. आर.देवरे , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व्ही.पी.हौसे, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. के.डी. गायकवाड, महिला सहाय्यक कार्यक्रमाधिकारी सौ. एस. बी. पाटील आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.विशाल हौसे यांनी कार्यक्रम आयोजनामागचा मानस हा विद्यार्थ्यांना ग्राहकाचे हक्क व जबाबदारी यासंदर्भात माहिती व्हावी हा असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत देवरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना ग्राहक कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी ग्राहक संरक्षण कायदा व या कायद्याअंतर्गत ग्राहकांचे हक्क, ग्राहकांच्या जबाबदाऱ्या, ग्राहकांनी वस्तू घेताना कोणती काळजी घ्यावी व ग्राहकाची जर फसवणूक होत असेल तर त्याविषयी तक्रार कशी करावी. या बाबतीत स्वयंसेवकांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच आतापर्यंत विविध ग्राहकांची झालेली फसवणूक व त्यांनी केलेल्या तक्रारी याबाबत माहिती दिली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एस. ए. वाघ यांनी आजच्या आधुनिक काळात ग्राहक म्हणून कसे जागरूक राहावे, त्याप्रती तरुणांची काय जबाबदारी आहे. जाहिरातींमधून होणारी फसवणूक याला कसे सामोरे जावे. या सर्व गोष्टींविषयी सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आभार सौ. एस. बी. पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन कु.विशाखा महाले हिने केले.या कार्यक्रमाला मोठया संख्येने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.