देवणी तहसील कार्यालय वरती शेतकरी संघटनेचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा

देवणी तहसील कार्यालय वरती शेतकरी संघटनेचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा

मागण्यांसंदर्भात सर्व विभागांचे २३ ऑगस्टला बैठक –

शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबितक मागण्यांसंदर्भात देवणी येथे शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर शुक्रवार (दि १६) रोजी शेतकरी संघटना व शेतकरी बांधवांच्या वतीने हनुमान मंदिर ते देवणी शहरांमध्ये ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये बोरोळ व देवणी परिसरातील सर्व ट्रॅक्टर मालक – चालक व शेतकरी बैलगाडीसह सहभाग घेतला होता. मागिल वर्षीच्या पिक विमा व इतर शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना व शेतकरी बांधवांच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते

 

हि ट्रॅक्टर रॅली शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हनुमान मंदिर देवणी येथुन रॅलीची सुरुवात करण्यात आली या रॅलीत ट्रॅक्टरसह शेतकरीबांधव सहभागी झाले होते. यावेळी श शेकडो शेतकरी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत ट्रॅक्टर रॅली देवणीतील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली.

देवणी येथील बोरोळचौक , मुख्य रस्ता , मुर्गी चौक, पंचायत समिती, , तहसील कार्यालय येथे रवाना झाली यादरम्यान देवणी -निलंगा -उदगीर मुख्य रस्त्याकडे जाणारी वाहतुक वाहतुकीसाठी कोणतीही अडचन नकरता पोलिस प्रशासनाने बंदोबस्त ठेवण्यात आला होता तहसील कार्यालय येथे शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की,

देवणी तालुक्यातील पंचनामे करूनही क्लेम मंजूर असुनही विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कृषी विमा नुकसान भरपाई मिळावी व

वन्य प्राण्यांपासून शेतीचे होणारं नुकसान थाबण्संयसाठी वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द करुन सर्व शेतकऱ्यांना १००% टक्के अनुदानांवर तारकुंपन देण्यात यावे,शेतीसाठी शेतकऱ्यांना दिवसा बारा तास उच्च दाबाने लाईट उपलब्ध करून देण्यात यावे, ग्रामीण बॅका, सहकारी बँक या बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या बँक खाते होल्ड करून सक्तीची कर्ज वसुली करीत आहेत, तरी संबंधीत अधिकाऱ्यांवर बैंक संघटीत गुन्हेगारीचा गुन्हे दाखल करण्यात यावे व सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देण्यात यावी, स्वामीनाथन आयोग लागु करावा,दुधातील होणारी भेसळ रोखुन गायीच्या दुधाला डिझेलचा भाव तर म्हशीच्या दुधाला पेट्रोलचा भाव देण्यात यावा, सोयाबीन पिकांच्या या वर्षी कमी दर मिळाला या फरकाच्या रक्कमेला सातबाऱ्यावरील पिकपेऱ्याची अट रद्द करावी व सरसकट सर्व शेतकऱ्यांना हि मदत जाहीर करावी व शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी., ऊसाला पाच हजार रूपये दर द्यावा अन्यथा दोन साखर कारखांन्यामचील हवाई अंतराची अट रद्द करण्यात यावी, या विविध मागण्यांचे निवेदन देऊन

शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष आनंद जीवणे व युवा आघाडी उपाध्यक्ष सत्यदेव लक्ष्मण गरड यांच्या नेतृत्वात हि ट्रॅक्टर रॉली आयोजित करण्यात आली होती यावेळी उपस्थित शेतकरी संघटना कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कालिदासजी आपेट ,शेतकरी संघटना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुरेंद्र अंबुलगे ,युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मिथुन दिवे ,मराठवाडा विभाग अध्यक्ष आनंद जिवणे उर्फ पृथ्वीराज पाटील व ज्येष्ठ शेतकरी नेते अमर मुर्के श्रीमंत अण्णा लुले योगेश तगडखेडे करीम भाई शेख चेतन मिटकरी संतोष जीवने मोरे पाटील उमाकांत जीवने मल्लिकार्जुन ईश्वर शेट्टी श्रीकांत धनुरे यांच्या उपस्थित हि ट्रॅक्टर रॉली कढण्यात आली

 

 

२३ ऑगस्ट रोजी सर्व विभागांचे अधिकारीसह बैठक….

 

शेतकरी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनातील विषयी सर्वा विभागांना कळवुन सर्व विभागांची शुक्रवारी (दि २३) रोजी एकत्रित बैठक घेऊन सर्व विषयांची चर्चा करुन सर्व विषय मार्गी लावण्याचे आश्वासन तहसील यांच्या कडून देण्यात आले