वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते अबॅकस स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान

वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते अबॅकस स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान

 

पाचोरा, दिनांक 13 (प्रतिनिधी ) : तालुक्यातील खडकदेवळा येथे घेण्यात आलेल्या अबॅकस स्पर्धेतील विजेत्यांना आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्ववंशी यांच्याहस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

 

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे डॉ. वाय. पी. युवा फाऊंडेशन व साईनाथ सार्वजनीक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने पारितोषीक वितरण पार पडले. बदामी सर व बदामी मॅडम यांच्या अकॅडमीच्या वतीने अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध विभागांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. यातील विजेत्यांना वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अनिल विश्राम पाटील, बी.एन. पाटील सर, बारकू मोतीराम पाटील, खुर्द सरपंच सुदाम वाघ, सोनवणे मॅडम, ग्रामसेवक विकास पाटील, पोलीस पाटील एकनाथ कोळी व तुकाराम तेली, डॉ. निळकंठ पाटील, अभियंता श्री महाजन, अनिल विश्राम पाटील, प्रमीला ज्ञानेश्वर पाटील, शेख हबीब शेख वासीफ, अमोल सावळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात वैदिक मॅथ या प्रकारात मैत्री श्रावण पाटील, झैनिया नईम शेख, अनम शेख रफीक, सिमरा नाझीम शेख, अफकान शेख रफीक या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर, अबॅकस या प्रकारात श्रेयस दीपक सोनार, हादक दीपक देवरे, मोहसीन रेहान, जुनेद जाबीर खान, तेजल दीपक देवरे, उमाइमा, जुल्करनैन वसीम, आर्यानी अमोल सावळे, सकीना बदामी व मुहम्मद अझीम यांचा गौरव झाला. तर सामान्य मॅथ या प्रकारात रेयान वसीम याला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.