कासारपिंपळगाव येथे हरीदास महाराज पालवे यांच्या काल्याच्या किर्तनाने अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता

कासारपिंपळगाव येथे हरीदास महाराज पालवे यांच्या काल्याच्या किर्तनाने अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”/अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासारपिंपळगाव येथे हनुमान मंदिरात ह.भ.प.हरीदास महाराज पालवे यांच्या काल्याच्या किर्तनाने अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता झाली.ह.भ.प. नानासाहेब देशमुख आणि ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली या दि.5 ते12 आँगष्ट या कालावधीत हा सोहळा संपन्न झाला. दररोज सकाळी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन करण्यात आले.दररोज पहाटे काकड आरती, सकाळी विष्णू सहस्त्र नाम, पारायण, दुपारी 3ते5 ह.भ.प.लक्ष्मण महाराज भवर यांचे प्रवचन झाले. वरील कालावधीत दररोज रात्री 7 ते 9 या वेळेत सर्व ह.भ.प.भागवत म.उंबरेकर,आदिनाथ म.दाणवे,भगवान म.मचे,सुनिल म.झांबरे,ज्ञानेश्वर माउली कराळे, उत्तरेश्वर म.जाधव,यांची किर्तने झाली. रविवारी सायंकाळी दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली होती. काल्याच्या किर्तनाने ह.भ.प. हरीदास महाराज पालवे यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली. ह.भ.प. विश्वनाथ महाराज चेके,गोरक्षनाथ जिवडे,यांनी पहाटे काकडा भजन केले.पांडुरंग म.खरड ,मच्छिंद्रबुवा चव्हाण, रामेश्वर म.गरड,संदिप म.लवांडे,भोसले महाराज यांनी गायन केले. माणिक महाराज गरड यांनी म्रुदुंगाचार्य म्हणून काम पाहिले.वेगवेगळ्या भाविकांच्या वतीने दररोज रात्री 9वाजता अन्नदान करण्यात आले.या सप्ताहात अनेक राजकीय मांन्यवरांनी भेटी देउन सुबेच्छा दिल्या. प्राथमिक आणि माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांनाही प्रिती भोजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.