वही गायन मंडळांचा वैशालीताई सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून पोशाख प्रदान करून व्यक्त केली कृतज्ञता

वही गायन मंडळांचा वैशालीताई सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून पोशाख प्रदान करून व्यक्त केली कृतज्ञता

 

पाचोरा, दिनांक 11 (प्रतिनिधी ) : खान्देशच्या लोकपरंपरेत अतिशय महत्वाचे स्थान असणाऱ्या वही गायन करणाऱ्या मंडळांना आज कानबाई उत्सवाच्या पावन पर्वावर वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून पोशाखाची भेट देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

 

कानबाई हा खान्देशातील सर्वात महत्वाचा उत्सव असून सर्वत्र याला उत्साहात साजरे करण्यात येते. यंदाच्या कानबाई उत्सवाला अतिशय चैतन्यदायी वातावरणात प्रारंभ झाला आहे. या उत्सवात ठिकठिकाणचे वहीगायन करणारी मंडळे ही कानबाईची महत्ता आपल्या खास शैलीतल्या संगीतमय प्रस्तुतीतून सादर करत असतात. वही गायनाला शेकडो वर्षांची परंपरा असून आता निवडक मोजकी अशी मंडळेच उरलेली आहे.

 

या अनुषंगाने आज श्रीमती कमलताई पाटील यांच्या हस्ते व शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून आज तालुक्यातील वही गायन मंडळाच्या सदस्यांचा सत्कार केला. यात पाचोरा कृष्णापुरी येथील सावता वही मंडळ, येथीलच जय माता पंचरंगी वही मंडळ, कोंडवाडा गल्लीतील गणेश वही मंडळ, बाहेरपुरा येथील जय संताजी वही मंडळ आणि संत सावता महाराज पंचरंगी वही मंडळ या मंडळांचा समावेश होता. यातील प्रत्येक सदस्याला पोशाख देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपण लोकपरंपरा जोपासण्यासाठी कायम कटीबध्द राहू अशी ग्वाही याप्रसंगी दिली.

 

या कार्यक्रमाला श्रीमती कमलताई पाटील यांच्यासह उध्दव मराठे, शरद पाटील, दादाभाऊ चौधरी, धीरज पीछान, नामदेव चौधरी, तिलोत्तमाताई मौर्य, विनोदआप्पा बाविस्कर, मनोज चौधरी, बंटी हटकर, नितीन लोहार, बंडू मोरे, गजू पाटील, विनोदआप्पा बाविस्कर, गफ्फारभाई सैयद, शशी पाटील, गौतम बागूल, भरतभाऊ खंडेलवाल, जयश्री येवले, कुंदन पंड्या, गजूभाऊ पाटील, संजय चौधरी, अकील शेख, सलीम शेख, शरीफ शेख, पप्पू जधव, निखील सोनवणे व नितीन खेडकर यांच्यासह शिवसेना-उबाठा, पक्षाच्या विविध आघाड्या तसेच युवासेनेचे पदाधिकारी वा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.