चोपडा शिक्षणशास्त्र विद्यालयात ‘शिक्षण सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

चोपडा शिक्षणशास्त्र विद्यालयात ‘शिक्षण सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित शिक्षणशास्त्र विद्यालयात “शिक्षण सप्ताह’’ निमित्त क्रीडा दिवस, शालेय पोषण दिवस व पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.पाटील यांनी भूषविले.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ.मुकेश पाटील हे उपस्थित होते.यावेळी शिक्षक श्री.विशाल बी. पाटील व कु.प्रियंका जी. पाटील आदि उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शक डॉ. मुकेश पाटीलयांनी विद्यार्थ्यांना मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात ‘एको- क्लब उपक्रम’/’शालेय पोषण दिवस’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पर्यावरणाचे महत्व तसेच पर्यावरणाचे संगोपन कसे करावे? हे विविध प्रकारच्या उदाहरणांच्या माध्यमातून पटवून सांगितले. वाढदिवसाच्या निमित्ताने ‘आपण केक न कापता एक झाड लावावे’ असे त्यांनी विद्यार्थांना आवाहन केले. यावेळी विद्यार्थांच्या हातून वृक्ष लागवड करण्यात आली.त्यात नारळाचे २, आंबा १, शेवगा १, अशोक १ अशी विविध झाडे लावण्यात आली.

या कार्यक्रमाप्रसंगी छात्राअध्यापिका मिनल योगेश कोळी यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाचे आभार मयुरी कोळी या छात्राध्यापिकेने मानले.या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.