शिक्षक मागणीसाठी पाचोरा भडगाव तालुक्यातील पालकांचे आमदार साहेबांना निवेदन

शिक्षक मागणीसाठी पाचोरा भडगाव तालुक्यातील पालकांचे आमदार साहेबांना निवेदन

 

 

पवित्र पोर्टल व्दारे जळगाव जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन शिक्षकांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू असून त्याच्या एक टप्पा म्हणून 7 मार्च 2024 रोजी शिक्षकांचे समुपदेशन होउन नियुक्ती झालेली आहे. राहिलेले शिक्षकांना दुसऱ्या टप्प्यात पुढच्या काही दिवसात समुपदेशन होऊन कधीही नियुक्ती आदेश मिळू शकतो. 7 मार्च रोजी आमदार साहेबांनी पाठपुरावा केल्याने तालुक्याला बारा शिक्षक मिळाले होते. ही शिक्षक संख्या शिक्षकांची मागणीचे तुलनेत अतिशय कमी होती. पाचोरा तालुक्यात जे शिक्षक मिळालेले होते त्या शिक्षकांची नियुक्ती मध्ये ही अनियमित्ता निदर्शनास आलली.नियम अनुसार ज्या शाळावर 70 टक्के शिक्षक होते तो शाळांना शिक्षक देऊ नये व 70 टक्के पेक्षा कमी शिक्षक असलेले शाळांनाच नवीन शिक्षक देण्यात यावे असे उल्लेख होते,परंतु ज्या शाळावर 70 टक्के शिक्षक उपलब्ध होते त्या ब्लॉक शाळांचे ब्लॉक खोलून त्या जागी शिक्षक उपलब्ध करण्यात आले व ज्या शाळावर 40 टक्के किंवा त्यापेक्षा कमी शिक्षक असलेले शाळांना शिक्षक मिळालेली नाही. नगरदेवळा उर्दू, भोकरी उर्दू, पिंपळगाव हरेश्वर उर्दू, लासगाव उर्दू ह्या शाळावर 50 टक्के पेक्षा कमी शिक्षक कार्य करत आहे. ह्या गावातील पालकांनी काही वर्षांपासून वेळोवेळी शिक्षकांची मागणी केलेली आहे, परंतु या शाळांना 7 मार्च रोजीही निराशा हाथ आली. नगरदेवळा उर्दू शाळा वर आठ शिक्षकांची जागा फक्त तीन शिक्षक काम करत आहे. ह्या सर्व गोष्टींच्या फटका गोरगरीब पालकांचे मुलांना सहन करावे लागत आहे. जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात उर्दू शिक्षकांची संख्या अतिशय कमी आहे. भडगाव- पाचोरा जिल्हा परिषद उर्दू शाळांचे संतापलेले पालक, ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य यांनी याबाबत किशोर आप्पा पाटील आमदार भडगाव -पाचोरा मतदारसंघ यांच्याशी संपर्क साधला, निवेदन दिले व पुढच्या काही दिवसात होणारी भरतीमध्ये जास्तीत जास्त शिक्षक पाचोरा तालुक्याला मिळावे असे निवेदन दिले. याबाबत आमदार किशोर आप्पा पाटील साहेब यांनी शिक्षणाधिकारी साहेब प्राथमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधून व आपले लेटर पॅड द्वारे अवगत करून तालुक्यात जास्तीत जास्त उर्दू शिक्षकांची मागणी केली. ह्या निवेदन मध्ये नगरदेवळा उर्दू शाळा येथे उपशिक्षक नेमणूक, जारगाव उर्दू शाळा येथे पदवीधर पदस्थापना, विविध उर्दू शाळांचे खोली बांधकाम, शाळा दुरुस्ती, विद्यार्थ्यांसाठी शौचालयाची उपलब्धता, असे अनेक मागणी होती. आमदार साहेबांना निवेदन देतयावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी जि.प.सदस्य रावसाहेब पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नगरदेवळा शेख वसीम गुलाम मोहम्मद, उपाध्यक्ष शेख अफरोज शेख रहिम, मुशताक ताज खान, उमर सांडू बेग, इमरान आसिफ अली, अकरम कुरैशी, शेख सलमान शौकत, आसिफ जलील, शेख जावेद रहीम, शेख राजू सलीम, शेख तालीब कुतुबुद्दीन, शाकीर अप्पा आदी मान्यवर उपस्थित होते.