महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नूतन कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नूतन कार्यकारिणी जाहीर.!!!

 

पाचोरा प्रतिनिधी :-

 

आज दिनांक ११जुलै रोजी पाचोरा येथे शासकीय विश्राम गृहात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली यावेळी नूतन ग्रामीण कार्यकरनी जाहीर करण्यात आली यावेळी नवीन सदस्यांना नियुक्ती पत्र देत सत्कार करून शुभेछा देण्यात आल्या.

 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, प्रदेशाध्यक्ष मा. वसंतराव मुंडे, राज्य संघटक मा. संजय भोकरे, राज्य महासचिव मा. डॉ. विश्वास राव आरोटे, राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली असून

 

१)प्रा.डॉ.विजय शालिग्राम गाडे यांची खान्देश विभागीय उपाध्यक्ष पदी

 

२)समाधान मैराळे यांची अंमळनेर ता अध्यक्ष पदी

 

३) नितीन पाटील यांची पाचोरा तालुकाध्यक्ष पत्रकार कृती समिती या पदावर निवड करण्यात आली

 

४)प्रा.अमोल झेरवाल पाचोरा शहर अध्यक्ष

पत्रकार हल्ला कृती समिती

५) प्रल्हाद पवार भडगाव.तालुकाध्यक्ष पत्रकार कृती समिती या पदावर निवड

६) मुझम्मील शेख भडगाव शहर अध्यक्ष

पत्रकार हल्ला कृती समिती

 

निवड करण्यात आली या वेळी खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा खान्देश विभागीय कार्याध्यक्ष अबरार मिर्झा,खान्देश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने. यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देत सत्कार करत निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील पत्रकार व सामाजिक हिताच्या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जळगाव ग्रामीण जिल्हा अध्यक्ष, नागराज पाटील,उपाध्यक्ष नंदकुमार शेलकर,पाचोरा ता अध्यक्ष प्रवीण ब्राम्हणे, शहर अध्यक्ष राजेंद्र खैरनार,तसेच अंमळनेरचे.सुरेश कांबळे,नुरखान पठाण, आत्मारामअहिरे,यांची उपस्थिती लाभले