आ. किशोर अप्पा पाटील व शिवसेनेच्या वतीने पाचोऱ्यात ‘लाडकी माझी लाडकी बहीण’ योजनेवर मार्गदर्शन मेळावा; उपस्थितीचे आवाहन

आ. किशोर अप्पा पाटील व शिवसेनेच्या वतीने पाचोऱ्यात ‘लाडकी माझी लाडकी बहीण’ योजनेवर मार्गदर्शन मेळावा; उपस्थितीचे आवाहन

पाचोरा (वार्ताहर) दि,५

पाचोरा-भडगांव शिवसेना महिला आघाडी व आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यावतीने शनिवार दि,६ रोजी पाचोऱ्यात दुपारी १ वाजता समर्थ

लॉन्स,सारोळा रोड पाचोरा येथे महिला सक्षमीकरण व ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या विषयावर महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या महत्वपूर्ण मेळाव्याला पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवुन महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचा निर्धार केला असून नुकतीच जाहीर झालेली महत्वाकांक्षी योजना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ व तत्सम महिला योजनांचा लाभ महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता भगिनींना मिळावा व त्यांना दरमहा या योजनेंतर्गत १५०० रूपये देऊन आत्मनिर्भर बनवता यावे या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभापासून पाचोरा भडगांव मतदार संघातील

कोणत्याही माता भगिनीं वंचित न राहता या योजनेचा लाभ त्यांना सुलभपणे घेता यावा व

लाभ घेतांना कोणतीही तांत्रीक अडचण येऊ नये यासाठी सविस्तर मार्गदर्शन या मेळाव्यात करण्यात येणार आहे.मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून

आ. किशोर आप्पा पाटील यांचेसह उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे ,प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे अरुण पवार,माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील,संजज गोहिल,तहसीलदार प्रविण चव्हाणके,पाचोरा ,तहसीलदार नितीन बनसोडे भडगाव,बालविकास प्रकल्प अधिकारी जिजाबाई राठोड ,गटविकास आधिकारी डॉ. स्नेहल शेलार,

गटविकास अधिकारी शे. अन्सार शे. अकबर,प्रशांत महाले,मुख्याधिकारी मंगेश देवरे,

मुख्याधिकारी रविंद्र लांडे लताबाई सावंत, सूर्यप्रताप राऊत बालविकास प्रकल्प अधिकारी, भडगांव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे

मेळावयासाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेस योजनेचा फॉर्म व महिलांसाठीच्या विविध योजनेचे माहीती पत्रक देण्यात येणार असून मेळाव्यानंतर अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे.तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील,उपजिल्हाप्रमुख किशोर बारावकर,उपजिल्हा प्रमुख डॉ विशाल पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील,संजय पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील,उपसभापती पी ए पाटील यांनी केले आहे.