वै.सद्गुरू यादवबाबा वाघोलीकर यांच्या पंढरपूर दिंडीचे, कासारपिंपळगाव, तिसगाव व्रुद्धेश्वर परीसरात जोरदार स्वागत

वै.सद्गुरू यादवबाबा वाघोलीकर यांच्या पंढरपूर दिंडीचे, कासारपिंपळगाव, तिसगाव व्रुद्धेश्वर परीसरात जोरदार स्वागत

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”अहमदनगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वै.यादवबाबा वाघोलीकर यांच्या प्रेरणेने आणि क्रुपाआशिर्वादाने सुरु असलेल्या श्री क्षेत्र वाघोली ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्याचे कासारपिंपळगाव परीसरात जोरदार स्वागत करण्यात आले.ह.भ.प. भाउसाहेब महाराज भालसिंग आणि वै. यादवबाबा वारकरी विश्वस्त मंडळ यांच्या सहकार्याने गेल्या ८९ वर्षांपासून तर थेट आजपर्यंत हा पंढरपूर दिंडी सोहळा अविरतपणे सुरू आहे.जेष्ठ चतुर्दशिला म्हणजे चार जुलै रोजी वाघोली येथुन या दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान झाले.” एवढा करा उपकार ,सांगा देवा नमस्कार “या उक्तीप्रमाणे मोठ्या जड अंतकरणाने वाघोली ग्रामस्थांनी या दिंडीला निरोप दिला.कोपरे येथे शहाजी वाघमोडे मंत्री,बळिराम खरात,भागिनाथ धोंडीबा दिंडे,जगन्नाथ बुवा आव्हाड आणि ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत करून प्रितीभोजन देण्यात आले.हनुमान टाकळी येथे संत वामनभाउ व भगवान बाबा मंदिरात संत जनाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. चंद्रकला शिवनाथ दगडखैर यांनी, बर्डे मेजर,ग्रामसेवक सुरेंद्र विठ्ठल बर्डे आणि अर्जुन जगताप,यांनी स्वागत केले. कासारपिंपळगाव येथे पत्रकार सुनिल नजन,प्रतिक नानासाहेब भगत,अरविंद भगत यांनी स्वागत केले. तिसगाव येथे राजेंद्र नाचनसर,प्रकाश आव्हाड, अरुणराव पुंड आणि भाउसाहेब ससाणे व वारकरी मंडळाच्या वतीने जोरदार स्वागत करून प्रिती भोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. शिरापूर येथे आदिनाथ लवांडे, आणि व्रुद्धेश्वर येथे लक्ष्मण पुरी,आणि गंगादेवी येथे भगवानराव कुटे यांनी जोरदार स्वागत केले.पंचक्रोशीतील गावात ही दिंडी प्रसिद्ध आहे.या यादवबाबा दिंडीला फार मोठी जूनी वैभवशाली परंपरा आहे.वै.सदगुरु यादवबाबा हे फार मोठे संत होउन गेले. अनेक गावातील भाविकांचे ते श्रद्धास्थान आहे. हा पायी दिंडी सोहळा दि.४ ते१६ जुलै या कालावधीत मजल दरमजल करीत आषाढी एकादशीला थेट पंढरपूरला पोहोचणार आहे.पंढरपूर प्रमाणेच आळंदी आणि पैठण येथे ही यात्रा काळात या दिंडीचे प्रस्थान होत असते.शेवगाव, पाथर्डी, आष्टी, करमाळा तालुक्यातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन वै.सदगुरु यादवबाबा वारकरी संस्थेच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.